आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी उद्धवस्त झालो...सगळं तुझ्यामुळे झालं', असे म्हणत बहिणीशी वाद घातला आणि मारली गोळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालोद (छत्तीसगड)- भावाने कुटुंब उद्धवस्त होण्यावर बहिणीला जबाबदार धरत चार गोळ्या मारल्या. बोलोद जिल्ह्यातील मोहंदीपाटमध्ये घटना घडली. महिलेला तत्काळ रूग्णालयात दाखल केले, सध्या तिची प्रकृती स्तिर आहे. पोलिसांना गोळ्या मारण्याऱ्या आरोपी भावाला अटक केले आहे. जखमी महिला शशीचे पती भागवत देवांगन म्हणाले की, आरोपी संतोष देवांगन बुधवारी रात्री त्यांच्या घरी आला होता. घरात आल्यावर त्याने शशीसोबत वाद घातला, म्हणाला- माझी पहिली बायको पळून गेली, दोन्ही मुलांचा मृत्यू झाला, या सगळ्यांना तुच जबाबदार आहेस.


इतक बोलून आरोपीने आपली बहिण शशीवर फायरींग केली. त्यानंतर शशीच्या पतीने शशीला तत्काळ रूग्णालयात भर्ती केले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. घटना झाल्यानंतर आरोपी पळून जाणार होता, पण अर्जुन्दा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर कलम 307, 452, 25, 27 आर्म्स अॅक्टच्या अंतरर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...