आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Brother Killed Sisters Secret Boyfriend After Finding Him Hiding At Her Bedroom

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुण भाऊ-बहिणीला घरात सोडून परदेशात गेले पालक, नातेवाइकांना सांगितले होते यांच्यावर नजर ठेवा; तरीही बहिणीने केले असे काही, भाऊ बनला खूनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या सेंट अल्बान्स क्राउन कोर्टमध्ये ऑनर किलिंग प्रकरणी सुनावणी सुरू असताना 16 वर्षांच्या मुलाचा क्रूर चेहरा समोर आला आहे. त्याने आपल्या बहिणीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून केला. त्या दिवशी या भाऊ-बहिणीचे आई-वडील परदेशात गेले होते. घरावर नजर ठेवण्यासाठी आसपासच्या नातेवाइकांना सांगण्यात आले होते. तरीही बहिणीने आपल्या प्रियकराला गुप्तरित्या प्रवेश दिला होता. त्यावरूनच संतप्त झालेल्या लहान भावाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या सुनावणीत प्रत्येकवेळा आरोपीने स्वतःला निर्दोष म्हटले आहे. कोर्टात त्या दिवशी नेमके काय घडले याचा संपूर्ण तपशील सादर करण्यात आला.


नातेवाइकांना सांगितले होते मुला-मुलीवर नजर ठेवा...
कोर्टात सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या भाऊ-बहिणीचे पालक अतिशय स्ट्रिक्ट होते. आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजमध्ये काय करतात किंवा कुणासोबत मैत्री करतात यावरही त्यांचे नियंत्रण होते. परदेशात जाण्यापूर्वी मुला-मुलींना स्पष्ट सांगितले होते की घरात कुठल्याही मित्र-मैत्रिणीला बोलवायचे नाही. एवढेच नव्हे, तर आस-पास राहणाऱ्या नातेवाइकांना सुद्धा विशेष जबाबदारी दिली होती. कधीही अचानक घरात येऊन धाड टाकण्याची आणि भाऊ-बहिणीवर नजर ठेवण्याची त्यांना सूट देण्यात आली होती.


भाऊ बाहेर जाताच घरात बोलावला बॉयफ्रेंड
10 जुलै 2018 रोजी ही घटना घडली. बहिणीचे वय 19 वर्षे होते. तसेच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या रिसान उदयकुमारला ती डेट करत होती. मुलांसोबत मैत्री करण्याचीही परवानगी न देणाऱ्या पालकांच्या गैरहजेरीत तिने आपल्या प्रियकराला गुप-चूप घरात बोलावले होते. भाऊ शाळेत होता तेव्हा ती आपल्या बेडरुममध्ये रिसानसोबत होती. कुठल्याही क्षणी तिचा भाऊ किंवा नातेवाइक येणार याची भीती तिच्या मनात होती. तरीही प्रेमाखातर तिने आयुष्यातील सर्वात मोठी रिस्क घेतली होती.


अचानक जोर-जारात वाजले बेडरुमचे दार...
सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली, की 10 जुलै रोजी बहीण आपल्या प्रियकरासोबत बेडरुममध्ये खासगी क्षणांत असताना अचानक तिच्या बेडरुमचे दार वाजले. पालकांनी तिच्या कुटुंबियांनी घरावर पाळत ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार, नातेवाइकांकडे घराच्या चाव्या देखील होत्या. त्यापैकीच एक नातेवाइक घरी आला. त्याने अख्ख्या घराची छानणी केली. बेडरुम त्या तरुणीचेच होते आणि लॉक होते. संबंधिताने बेडरुमचेही दार वाजवून चेक केले. काहीच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा घरात कुणीच नसल्याचे समजून तो निघून जाईल असे मुलीला वाटले होते. दार वाजवण्याचे आवाज बंद झाल्यानंतर नातेवाइक निघूनही गेला. परंतु, तरुणी इतकी घाबरली होती की तिला काहीही सूचत नव्हते.


मग चाकू घेऊन घरात घुसला भाऊ...
नातेवाइक निघून गेल्याच्या अर्ध्या तासानंतर पुन्हा बेडरुमचे दार वाजले. यावेळी पूर्वीपेक्षा जोरात... जणू दार आताच तुटेल... यानंतर भावाने धमक्या देऊन दार उघडण्यास सांगितले. बहिणीने वेळीच आपल्या प्रियकराला लपण्याचा प्रयत्न सुरू केला. बेडरुम आणि बाथरुममध्ये लपविणे योग्य नव्हते. बेडरुममला लागूनच घराचे गॅरेज होते. तिने वेळीच रिसानला त्या ठिकाणी पाठवले. तेथून बाहेर जाण्याचा रस्त नव्हता. बहिणीने दार उघडताच 16 वर्षांचा भाऊ तिला धक्का देऊन आत घुसला. पलंगाखाली, कपाटात आणि बाथरुममध्ये अशा सर्वच ठिकाणी शोध घेतला. यानंतर त्याची नजर गॅरेजच्या दारावर गेली. तेथेच रिसान हातांनी आपले डोके लपवून कोपऱ्यात बसलेलाला होता. रिसान दिसताच आरोपीने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. रिसानने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. तो चुपचाप मार खात होता. भावाच्या मागे बहीण सुद्धा धावून गेली. तेव्हा आरोपी भावाने आपल्या पॅन्टमध्ये लपवलेले चाकू बाहेर काढला आणि शिवीगाळ करत त्याच्या छातीत घातक प्रहार केला. वार इतका भयंकर होता की रिसान जागीच कोसळला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.