आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावानेच गरोदर बहिणीवर गोळ्या झाडून केली हत्या, दुसऱ्या जातीमधल्या मुलासोबत लग्न केल्यामुळे होता नाराज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर(मध्यप्रदेश)- येथील एका अल्पवयिन भावाने गरोदर बहिणीची गोळी मारून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, बहिणीने दुसऱ्या जातीमधल्या मुलासोबत लग्न केले होते, त्यामुळे तिचा भाऊ नाराज होता. महिला 6 महिन्यांची गरोदर होती.


घटना बेटमाच्या रावद गावची आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार शनिवारी सकाळी शुभम जाट आणि कार्तिक आपली बहिण बुलबुलच्या सासरी पोहचले. त्यांच्यासोबत इथर 10 ते 12 लोक होते. बहिणीने दुसऱ्या जातीमधल्या मुलासोबत लग्न केल्यामुळे तो खूप नाराज होता. बहिणीच्या सासरी गेल्यानंतर वाद सुरू झाला. काही वेळानंतर बहिण त्याला समजवण्यासाठी आली, तेव्हा त्याने खिशातून पिस्तुल काढून बहिणीच्या डोक्यात गोळी मारली. त्यानंतर सासरच्या लोकांनी तत्काळ बुलबुलला रूग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


न्यायालयातून पतीसोबत राहण्याचा मिळाला होता आदेश
बुलबुलचे पती कुलदीपने सांगितले की, बुलबुलचे आणि त्याचे जात वेगळी होती. त्या दोघांत प्रेम जुळले आणि त्यांनी लग्न केले. काही दिवसानंतर बुलबुलचे कुटुंबीय तिला आपल्यासोबत घेऊन गेले. त्यानंतर त्याने कोर्टात धाव घेतली आणि काही महिन्यांपूर्वीच कोर्टाच्या आदेशावरून ते दोघे सोबत राहू लागले.

बातम्या आणखी आहेत...