आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभागलपूर(बिहार)- गुरूवारी दुपारी करंट लागल्याने भाऊ-बहिणीचा एकसोबत करूण अंत झाला. संबंधित घटना पूरब टोला परिसरात घडली. पोलिसांनी दोघांच्याही मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. इशाकचक पोलिस ठाण्याचे इंस्पेक्टर संजय कुमार यांनी सांगितले की, घटना कपेड वाळवत असताना घडली. यात उमर खली(10) आणि बेबी लाडली(20) यांचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या वेळी घरात कोणीच नव्हते. त्यांचे वडील मोहम्मद परवेज आंब्याच्या शेतात रकवाली करण्यासाठी गेले होते आणि आई शेजारच्या घरात गेली होती. तुर्तास पोलिस घटनेचा तपास करत आहे.
एकदिवसापूर्वीच घरी आली होती मुलगी
कुटुंबीयांनी सांगितले की, बेबी विवाहीत होती आणि तिला 1 वर्षांची छोटी मुलगीदेखील आहे. बेबी बुधवारी दिल्लीवरून घरी आली होती. घराच्या छतावर कपडे वाळवत असताना तिल विजेच्या तारांचा करंट लागला, या दरम्यान मुलगा उमर खलीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचाही करंट बसून मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.