आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bruce Lee's Daughter Filed Complaint Against China's Fast Food Chain Accusing Of Using Father's Photo Without Permission

ब्रूस लीच्या मुलीने चीनच्या फास्ट फूड चेनवर ठोकला 213 कोटी रुपयांचा दावा, परवानगी न घेता वडिलांच्या फोटोचा वापर केल्याचा आरोप

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

बीजिंग : कुंग फू मास्टर ब्रूस लीची मुलगी शानोन ली हिने चीनमधील प्रसिद्ध फास्ट फूड चेन रियल कुंग फू वर नुकसान भरपाईचा खटला दाखल केला आहे. कंपनीने आपली परवानगी न घेता वडिलांच्या छायाचित्राचा वापर केल्याचा तिचा आरोप आहे. शनोन कॅलिफोर्नियामध्ये ब्रूस ली इंटरप्रायजेस चालवते. शानोनने फास्ट फूड चेनकडे आपल्या वडिलांचे छायाचित्र वापरण्यास मनाई केली आहे. तसेच, काेणताही संबंध नसताना, ९० दिवस या छायाचित्राचा वापर केल्याबद्दल कंपनीला जाब विचारला आहे. शानोन हिने कंपनीकडे २१३ कोटी रुपये (३० दशलक्ष डॉलर)ची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ग्वांगझाऊ येथील फास्ट फूड सेंटरची स्थापना १९९० मध्ये झाली. संपूर्ण चीनमध्ये याचे ६०० आऊटलेट आहेत. चेनच्या लोगोमध्ये कुंगफू पोझमध्ये ब्रूस लीच्या सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचे छायाचित्र आहे. चेन याचा वापर २००४ पासून करते आहे. कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नॅशनल ट्रेडमार्क एजन्सीच्या अवघड अशा स्क्रीनिंग टेस्टमधून गेल्यानंतर आम्हाला हा लोगो मिळालेला आहे. आम्ही नोटिसला उत्तर देऊ, असे कंपनीने म्हटले आहे. मार्शल अार्टचा बादशहा म्हणून ओळख असलेल्या ब्र्रूस लीचे १९७३ मध्ये निधन झाले होते. त्याच्या मुलाचाही १९९३ मध्ये मृत्यू झाला होता.