आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bryant Dane Played For Decades From The LL Lakers; Picks For The NBA At The School Level Due To Remarkable Play

ब्रायंट दाेन दशकांपासून एलएल लेकर्सकडून खेळला; उल्लेखनीय खेळीमुळे शालेय स्तरावरच एनबीएसाठी निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलीच्या टीमला काेचिंगसाठी खासगी हेलिकॉप्टरने जात हाेता

लॉस एंजलिस- जगातील बास्केटबाॅलच्या विश्वाला धक्का देणारी घटना साेमवारी घडली. याच घटनेने अमेरिकेच्या बास्केटबाॅल विश्वाने अापला दिग्गज अाणि सुपरस्टार असा खेळाडू गमावला. काेट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ४१ वर्षीय बास्केटबाॅलपटू काेबे ब्रायंंटचा अपघातामध्ये जागीच  मृत्यू झाला. त्याच्या  खासगी हेलिकॉप्टरला  भीषण अपघात झाला. यामध्ये काेबे ब्रायंट अापल्या १३ वर्षीय मुलगी गियानासाेबत मृत्युमुखी पडला. याशिवाय सात जणांनाही अापला प्राण गमवावा लागला. 


अचानक घडलेल्या या भीषण अपघातामुळे एनबीएने अापला सुपरस्टार खेळाडू गमावला. यामुळे एनबीवर सध्या शाेककळा पसरली अाहे. अनेक दिग्गजांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. 

वडीलही बास्केटबाॅलपटू, त्यांचे मिळाले मार्गदर्शन


फिलाेडेल्फियामध्ये काेबे ब्रायंटचा २३ अाॅगस्ट १९७८ मध्ये जन्म झाला. त्याला घरामध्येच वडील जेलिबीन यांच्याकडून बास्केटबाॅलच्या खेळाचे बाळकडू मिळाले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच काेबेला या खेळासाठीची अावड निर्माण झाली. वडिलांना खेळताना पाहिल्यामुळे त्याच्या अावडीला अधिकच चालना मिळाली. यातूनच त्याने याच खेळात अापले करिअर करण्याचा निर्णय घेतला.  त्याची शालेय स्तरावरील या खेळातील चुणूक अधिकच  लक्षवेधी  ठरली. यातून त्याची एनबीएसाठी निवड झाली.

विक्रमी करिअर

> पाच वेळा एनबीए चॅम्पियन. ४ वेळा अाॅल-स्टार माेस्ट व्हॅल्युएबल पुरस्काराचा मानकरी.  
> विक्रमी ११ वेळा ऑल-एनबीए फर्स्ट टीममध्ये सहभागी. फक्त   लेब्रन जेम्स (१२) अाघाडीवर. 
> १८ वेळा एनबीए ऑल स्टार टीममध्ये निवड.फक्त  अब्दुल जब्बार (१९) अाघाडीवर अाहे. 
>८१ पॉइंट स्कोअरची २००६ मध्ये  टोरंटो रॅप्टर्सविरुद्ध नाेंद. सर्वाधिक गुण नाेंदवणारा दुसरा.

विल्ट चेंबरलेन (१०० गुण) अाघाडीवर. 

ब्रायंटने करिअरमध्ये ३३,६४३  पॉइंट स्कोअरची नाेंद. सर्वाधिक गुणांमध्ये चाैथ्या स्थानी.  जब्बार (३८,३८७) अव्वल स्थानावर.

स्वत:वर व्हिडिअाे गेम; 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक
  
ब्रायंटने लेकर्स संघाकडून खेळताना  एनबीएमध्ये अापला दबदबा निर्माण केला. त्याने अापल्या खेळीमुळे या विश्वात अल्पावधीतच नवीन अाेळख मिळवली. याशिवाय काेट्यवधी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या खेळीने माेठ्या संख्येने चाहते या एनबीएकडे वळले. याच माध्यमातून काेबे ब्रायंटने स्वत:वरच व्हिडिअाे गेम तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याने अथक परिश्रमातून हा गेमही यशस्वीपणे साकारला. त्याने  “निनटेंडो’ नावाचा गेम तयार केला. ब्लॅक मांबा नावाने लाेकप्रिय असलेला ब्रायंटने निवृत्तीपूर्वी  चीनच्या ई-कॉमर्स कंपनी अलिबाबामध्ये १०० मिलियन डाॅलरची गुंतवणूक  केली. तसेच २०१३ मध्ये त्याने स्वत:ची कंपनीही सुरू केली अाहे.

ओबामांचे ट्विट;  काेर्टवरचा एक दिग्गज स्टा


काेर्टवर दिग्गज खेळाडूच्या रूपाने ब्रायंटचे वास्तव्य हाेते. मुलीच्या रूपाने त्यांच्या कुटंुबाचे बास्केटबाॅलमधील दुसरे युग सुरू झाले.   
-बराक ओबामा, माजी  राष्ट्रपती, अमेरिका 


ब्रायंट, मुलगी गियाना यांच्या अपघाती निधनाची वार्ता धक्का देणारी ठरली. त्यांचे बास्केटबाॅल खेळातील याेगदान  माेलाचे ठरले अाहे.
-सचिन तेंडुलकर,  माजी क्रिकेटपटू, भारत
 
काेबे हा एनबीएमधील बादशहा हाेता. अाता त्याला अाणि मुलगी गियानाच्या अात्म्याला शांती मिळाे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.  
-व्हिव्हियन रिचर्ड्स, माजी क्रिकेटपटू,  विंडीज 
 
 काेबे हा काेर्टवरचा किंग  हाेता.त्याच्या खेळात जादू हाेती. हीच खेळी पाहण्यासाठी मी भल्या पहाटे उठून सामने पाहत हाेताे.
-विराट कोहली, कर्णधार, भारतीय क्रिकेट संघ. 


कोबे  अाणि गियानाच्या अकाली मृत्यूची बातमी धक्का देणारीच अाहे. हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यासारखे नाही. सर्वांचा ताे लाडका हाेता.  
-मायकेल जॉर्डन