आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BS Yeddyurappa Meets Karnataka Governor To Form Government, Wants To Take Oath Early

कर्नाटकः बीएस येदियुरप्पांनी घेतली राज्यपालांची भेट, सरकार स्थापनेचा दावा; आज 6 वाजता शपथविधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर शुक्रवारी भाजपचे बीएस येदियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेतली. सकाळी 10 वाजता त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी पुरेसे बहुमत असल्याचा दावा केला आहे. कर्नाटकमध्ये तीन दिवसांपूर्वीच सत्ताधारी पक्षांतील बंडखोरांनी सरकार पाडले. आता बीएस येदियुरप्पा लवकरात लवकर मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास इच्छुक आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता येदियुरप्पा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

मंत्रिमंडळाची स्थापना एक आव्हानच
भावी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना नवीन मंत्रिमंडळ स्थापित करणे मोठे आव्हान ठरणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 15 बंडखोरांसह 56 आमदार असे आहेत ज्यांनी 3 किंवा त्याहून अधिक वेळा निवडणूक जिंकली होती. या सर्वच आमदारांना राज्यातील मंत्रिमंडळात मोठी भूमिका मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह केवळ 34 पदांना मंजुरी आहे. अशात विरोधी पक्षात बंडखोरी करून येणाऱ्या आणि स्वकीयांच्या अपेक्षा येदियुरप्पा कशा पूर्ण करतील हा एक प्रश्नच आहे.

 

यापूर्वी दोन दिवसांचे मुख्यमंत्री बनले होते येदियुरप्पा
कर्नाटकात गतवर्षी मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तरीही आकडेवारी असल्याचा दावा करत येदियुरप्पांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली होती. परंतु, अवघ्या 48 तासांत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. कारण, बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे संख्याबळ नसल्याचे उघड झाले होते. यानंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) एकत्रित येऊन सत्ता स्थापित केली. परंतु, सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने 14 महिन्यांतच हे सरकार कोसळले. एकूणच 17 बंडखोर आमदारांपैकी 3 आमदारांना कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले. त्याच्या अवघ्या काही तासांतच येदियुरप्पा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी पोहोचले.

बातम्या आणखी आहेत...