आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएस येदियुरप्पा यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, 31 जुलैला बहुमत सिद्ध करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू(कर्नाटक)- भाजप नेते बीएस येदियुरप्पा यांनी आज(शुक्रवार) कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याआधी ते राज्यपाल वजुभाई वाला यांना भेटण्यासाठी राजभवनात गेले होते. त्यांनी कर्नाटकात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. 31 जुलैला ते विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. 23 जुलैला कुमारस्वामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले होते. बहुमत सिद्ध न करू शकल्याने  काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार फक्त 14 महिन्यात कोसळले. त्यानंतर आता येदियुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.


सरकार बनवण्याच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी कर्नाटकच्या भाजप नेत्यांचे एक मंडळ गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते. यात भाजप नेते जगदीश शेट्टार आणि अरविंद लिम्बावलीसहित जेष्ठ नेते होते. 


येदियुरप्पांसाठी मंत्रीमंडळ स्थापन करणे अवघड
मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्यासाठी मंत्रीमंडळाची स्थापना करणे तारेवरची कसरत होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 15 बंडखोरांसहित 56 आमदार असे आहेत, ज्यांनी 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस आमदार झाले आहेत. त्या सगळ्यांना नवीन सरकारमध्ये मोठे स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. पण, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांसहित फक्त 34 पद स्वीकृत आहेत. 

 

चार दिवसांच्या चर्चेनंतर फ्लोर टेस्टमध्ये कुमारस्वामी झाले फेल
23 जुलैला संध्याकाळी कुमारस्वामी सरकार फ्लोर टेस्टमध्ये फेल झाली. विश्वास प्रस्तावादरम्यान अध्यक्षांना हटवून आमदारांची संख्या 204 होती आणि बहुमतासाठी 103 चा आकडा पार करणे गरजेचे होते. पण यावेळी काँग्रेस-जेडीएसच्या वाट्यात फक्त 99 मते पडली, तर विरोधात 105 मते पडली. कुमारस्वामी 14 महीन्यांपासून 116 आमदारांच्या सोबतीने सरकार चालवत होते, पण या महिन्यात 15 आमदारांनी बंडखोरी केली आणि कुमारस्वामींच्या अडचणी सुरू झाल्या.
 

बातम्या आणखी आहेत...