आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बंगळुरू- कर्नाटकमध्ये आज(गुरुवार) बीएस येदियुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारात 10 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. कुमारस्वामी सरकारदरम्यान काँग्रेस आणि जेडीएच्या ज्या आमदारांनी राजीनामा दिला होता, त्यांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र घोषित केले होते. नंतर या बंडखोरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत विजय मिळवला. आजच्या शपथविधीनंतर कॅबीनेटमध्ये 28 मंत्री झाले आहेत.
कर्नाटकमध्ये दोन महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये विधानसभेच्या 15 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. तेव्हा भाजपने 12, काँग्रेस ने 2 आणि एका अपक्षाने एक जागा जिंकली होती. येदियुरप्पा यांनी भाजपमध्ये आलेल्या सर्व आमदारांना मंत्रीपदाचे वचन दिले होते.
पोटनिवडणुकीत जिंकलेले रमेश जारकिहोली, एसटी सोमशेखर, अनंत सिंह, के सुधाकर, बी बासवराज, शिवराम हेब्बर, एचसी पाटिल, के गोपालैया, केसी नारायण गौड़ा आणि बीसी पाटिल यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. या विस्तारात भाजपच्या एकाही आमदाराला स्थान देण्यात आले नाही. परंतू, रविवारी येदियुरप्पा यांनी भाजपच्या तीन जेष्ठ नेत्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यासंबंधी वक्तव्य केलं होते. यात अरविंद लिंबावली, सीपी योगेश्वरा आणि उमेश कट्टी सामील आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.