आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएस येदियुरप्पांनी विधानसभेत ध्वनिमताने सिद्ध केले बहुमत, एका अपक्षासहित 106 आमदारांचे समर्थन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळरू(कर्नाटक)- मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी आज(सोमवार) कर्नाटक विधानसभेत विश्वास प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव ध्वनिमताने पास झाला आणि भाजप सरकारने बहुमत सिद्ध करुन परत एकदा सत्ता स्थापन केली. यावेळी येदियुरप्पा म्हणाले की, जेव्हा सिद्धारमैया आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री होते, तेव्हा मी कोणत्याच प्रकारच्या सुडीचे राजकारण केले नाही. प्रशासनिक व्यवस्था निकमी झाल्या आहेत, आम्ही फक्त अधिकाऱ्यासांठी लढत होतो. मी माफ करण्यात विश्वास ठेवणारा माणुस आहे, तर विरोध करण्याबद्दल कोणताच राग नाही.

 

काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर येदियुरप्पांनी 26 जुलैला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी कारवाई करत 17 बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले होते. त्यामुळेच येदियुरप्पांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 224 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी 104 चा आकडा पार करवा लागणार होता. येदियुरप्पांकडे एक अपक्ष मिळून 106 आमदारांचे समर्थन होते.


यावेळी येदियुरप्पा म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांना धन्यवाद करतो. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे आणि त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांना 'प्रधानमंत्री किसान योजने'चे 2000 हजार रुपये तत्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच विरोधकांकडून विश्वास प्रस्तावात सहकार्याची अपेक्षा करतो. काँग्रेस नेते सिद्धारमैया म्हणाले- आम्ही कुमारस्वामींच्या विश्वास प्रस्ताववर चार दिवस चर्चा केली होती. येदियुरप्पा यांना म्हणालो होतो के, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापर राज्यात काय परिस्थिती असेल ? जनतेसाठी काम करण्याच्या त्यांच्या भावनेला शुभेच्छा देतो.