आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये केली आत्महत्या; कॉलेजवरून निघताना फ्रेंड्सला म्हणाली - बाय बाय, आता सहावे सेमिस्टर करणार नाही, कॉलेज पण नाही करणार.... मैत्रिणीने सांगितले तिचे दुःख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर (हरियाणा) : डीएवी गर्ल्स कॉलेजची विद्यार्थीनीने अभ्यास झेपत नसल्यामुळे बुधवार रोजी हॉस्टेलच्या रूममध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली. छवि ऊर्फ निक्की असे विद्यार्थीनीचे नाव आहे. एकूण परिस्थितीचे अनुमान घेतल्यानंतर छविने सुरूवातीपासूनच आत्महत्येचा निर्धार केल्याचे दिसून आले होते. आपल्या मैत्रिणीला देखील याबाबत ती एकदा म्हणाली होती.   

 

सततच्या नापास होण्यामुळे झाली होती उदासीन

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छविने बीएसस्सी कॉम्प्युटर सायंसला प्रवेश घेतला होता. पण हा अवघड अभ्यासक्रम तिला झेपत नव्हता. पहिल्या सेमिस्टरपासून ती नापास होत होती. तिने आतापर्यंत एकही सेमिस्टर पूर्णपणे क्लिअर केले नव्हते. ती सध्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये आली होती पण मागील सेमिस्टर क्लिअर न केल्यामुळे तिला पुढे जाता येत नव्हते. यामुळे पालकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आणि परीक्षा पास होण्याचे प्रेशर वाढत गेले. बुधवारी गणिताचा पेपर दिल्यानंतर हॉस्टेलच्या रूममध्ये आली आणि रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 

 

झोपेच्या गोळ्या घेत होती. 
छविच्या मैत्रिणींनी सांगितले की, ती नेहमीच परेशान राहत होती. वर्गात सुद्धा कोणाशी जास्त बोलत नव्हती. तसेच कॉलेज किंवा इतर अॅक्टीव्हीटीमध्ये ती सहभागी होत नव्हती. डिप्रेशनमध्ये असल्यामुळे तिला रात्रीची झोप येत नसल्यामुळे ती झोपेच्या गोळ्या घेत होती. 


 

आत्महत्येपूर्वी लिहीली सुसाइड नोट -   मी बीएसस्सी नाही करू शकत, दुसरीकडे अॅडमीशन करा असे तुम्हाला म्हणण्याची माझी हिम्मत नाही. 
"सॉरी...मम्मी-डॅडी. मी बीएसस्सी नाही करू शकत. माझ्याकडून हे नाही होणार. इतका सगळा ताण मी नाही सहन करू शकत. याबाबत मी खूप विचार केला पण याशिवाय माझ्याकडे कोणताही मार्ग नव्हता. मला तुम्हाल सांगण्याची हिम्मत नाही की माझे अॅडमिशन दुसरीकडे करा. मी चांगले गुण मिळवण्याचा अगदी मनापासून प्रयत्न केला. पण नाही करू शकले. तुम्हाला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत पण मी त्या पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मी जात आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या." छविने आत्महत्येपूर्वी अशाप्रकारची सुसाइड नोट लिहीली होती. 


ती मला रोज फोन करत होती, पण काल रात्री नाही केला 

छविच्या मैत्रिणीने सांगितले की, छविला आयुष्यात खूप मोठे व्हायचे होते. तिने बीएसस्सी नंतर एमएसस्सी करावी अशी तिच्या पालकांची इच्छा होती. ती अभ्यासात देखील हूशार होती. बीएसस्सीचा चांगल्याप्रकारे अभ्यास करत होती. पण माहीत नाही ती पास होत नव्हती. तिला असे वाटत होते की तिच्याकडून बीएसस्सी पास होणार नाही. पण ती अर्ध्यातून सोडू शकत नव्हती. कारण तिला आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. बुधवारी पाचव्या सेमिस्टरच्या मॅथचा पेपर होता. तिला तो पेपर अवघड गेला. कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर तिने मैत्रिणींना सांगितले की,  बाय बाय, आता ती सहावे सेमिस्टर करणार नाही. तसेच कॉलेजमध्ये देखील येणार नाही.

 

रोज रात्री छविचे आणि तिच्या मैत्रिणीचे फोनवर बोलणे होत असत.  त्यादिवशी तिचा फोन न आल्यामुळे मैत्रिणीने तिला कॉल केला. तीन वेळेस कॉल करून देखील छविने उचलला नाही. दोन वेळेस दुसऱ्याच्या नंबरवरून केला. पण तरीही तिने उचलला नाही. छवि तिच्या रूममध्ये एकटीच होती. तिचे रूममेट आपल्या गावी गेले होते. यामुळे मैत्रिणीने वार्डनला फोन करून छवि फोन उचलत नसल्याचे सांगितले. वार्डन तिच्या रूममध्ये गेल्यानंतर छविने गळफास घेतल्याचे त्याला आढळून आले. 

बातम्या आणखी आहेत...