आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BSE SENSEX 2020 Vs Recession 2008 India Latest News Updates Over Sensex Falls 3000 Points

2008 च्या मंदीपेक्षा वाइट परिस्थिती 2020 ची! त्यावेळी 889 अंकांनी पडत होते मार्केट आता 3000 ची मासिक सरासरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतासह जगभरातील बाजारपेठांची सध्याची अवस्था 2008 च्या मंदीपेक्षा वाइट असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी 68 दिवसांतच सेंसेक्स 6 वेळा 700 पेक्षा अधिक अंकांनी गडगडला. दोन वेळा तर ही घसरण 2000 पेक्षा अधिक होती. 2008 च्या जागतिक मंदीची तुलना केल्यास सर्वात मोठे 6 झटके 10 महिन्यांमध्ये पाहण्यात आल्या होत्या. त्यावेळी वर्षभरात केवळ एकच अशी घसरण होती जी एक हजारपेक्षा अधिक अंकांची होती. ती घसरण सुद्धा कमाल 1408 अंकांची होती. तर या वर्षी 28 फेब्रुवारीला 1448 आणि आज (9 मार्च) तब्बल 2300 अंकांनी बाजार कोलमडले आहे.

2008 मध्ये 10678 अंकांची घसरण, यंदा अडीच महिन्यांतच 6000 अंकांनी पडले सेंसेक्स
या वर्षी 1 जानेवारीला सेंसेक्स 41,349 अंकांवर उघडले होते. याच दिवशी 43 पॉइंट घसरून 41,306 अंकांवर बंद झाले. 9 मार्चला सेंसेक्स 35,300 पर्यंत गडगडले. अर्थात या वर्षी सुरुवातीच्या अडीच महिन्यांमध्येच तब्बल 6000 अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे. 2008 ची आकडेवारी पाहिल्यास, 1 जानेवारी रोजी सेंसेक्स 20,325 अंकांवर उघडले होते. वर्षांच्या शेवटपर्यंत 31 डिसेंबर रोजी सेंसेक्स 9,647 पॉइंट्सवर बंद झाले होते. या वर्षभरात सेंसेक्समध्ये 10678 अंकांपर्यंत घसरण झाली होती. अर्थात सेंसेक्स घसरण्याची महिन्याची सरासरी 889 अंक होती. यावेळी मात्र सेंसेक्स दरमहा सरासरी 3000 अंकांपर्यंत घसरत असल्याचे पाहायला मिळाले.

ही असू शकतात कारणे
2008 च्या आर्थिक मंदीचे कारण रियल एस्टेट आणि फायनांशियल सेक्टर होते. अमेरिकेतील सर्वात मोठी रियल एस्टेट कंपनी लेहमन ब्रदर्स, फ्रेडी मॅक, फेनी-मे यांनी दिवाळखोरी जाहीर केली होती. तर यावेळी सेंसेक्स घसरण्याची कारणे म्हणून अमेरिका आणि इराणमधील वाद, कोरोना व्हायरस, सौदी अरेबिया क्राउन प्रिन्स आणि भारतीय बँकिंग सिस्टिम इत्यादींना जबाबदार धरले जात आहे.