आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BSE Sensex | Stock Market Latest Update: Trade BSE, Nifty, Sensex Live News Updates

उच्चांकी पातळीच्या ४२ सत्रांत ९१७४ अंक घसरला सेन्सेक्स, ३३.६३ लाख कोटी साफ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना विषाणू जगभरात आरोग्य आणीबाणी ठरली आहे, यासोबत त्याने जागतिक अर्थव्यवस्थेलाही कवेत घेतले आहे
  • १४ जानेवारीला ४१९५२ च्या स्तरावर सेन्सेक्स, आता ३२७७८ पर्यंत घसरला
  • सेन्सेक्समध्ये टक्केवारीच्या दृष्टीने २००८ नंतर सर्वात मोठी घसरण नोंद
  • स्टॉक मार्केट : घसरणीनंतर,पोर्टफोलिओ सुधारण्यास संधी

नवी दिल्ली - कोरोना विषाणू जगभरात सामान्यापेक्षा जास्त अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त घातक सिद्ध होत आहे. हा विषाणू जगभरातील आरोग्य आणीबाणीसह अार्थिक उद्‌ध्वस्तता ठरली आहे. गुरुवारी पुन्हा एकदा सेन्सेक्समध्ये अंकांच्या दृष्टीने इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदली आहे. बीएसईचा सेन्सेक्स २९१९.२६ अंक म्हणजे, ८.१८ घसरून ३२७७८.१४ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८६८.२५(८.३०%) खाली येऊन ९५९०.१५ अंकावर बंद झाला. चीनपासून सुरू होऊन हा अमेरिका, इटली, ब्रिटन आणि भारतासह ७० पेक्षा जास्त देशांत फैलावला आहे. असे असले तरी याचा परिणाम केवळ आरोग्यापुरता मर्यादित नाही. हवाई वाहतूक आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रवेश करून या विषाणूने जगभरातील अर्थव्यवस्थेला कवेत घेतले आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, या विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे सुमारे १४८ लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूने आर्थिक महामारीचे रूप धारण केले.जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी कोरोनाला जागतिक महामारी घोषित केली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ब्रिटन वगळता युरोपातील लोकांच्या अमेरिका प्रवासावर निर्बंध लादले. त्यामुळे अमेरिकी शेअर बाजार डाऊ जोन्समध्ये १४६४.९४ अंक(५.८६%)ची इतिहासातील सर्वात मोठी एका दिवसातील घसरण नोंदवली. सौदी आणि यूएईद्वारे क्रूड उत्पादन १० लाख बॅरल प्रतिदिन वाढवण्याच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी कमी केल्या आहेत.
 

१४ जानेवारीला ४१९५२ च्या स्तरावर सेन्सेक्स, आता ३२७७८ पर्यंत घसरला


१४ जानेवारीला सेन्सेक्स ९३ अंक वाढीसह ४१,९५२.६३ च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. तेव्हापासून आतापर्यंत ४२ सत्रांत सेन्सेक्स ९,१७४.४९ अंक(२१.८७%) कोसळला आहे. दुसरीकडे या दरम्यान शेअर बाजारात रुपया कमी झाला. १४ जानेवारीला व्यवसाय समाप्तीवर बीएसईचे बाजार भांडवल १५९.३३ लाख कोटी रुपये होते. यानंतर आतापर्यंत १२५.७० लाख कोटी रु. राहिले. दुसरीकडे, गुरुवारी सेन्सेक्सची विक्रमी २९१९.२६ अंकां(८.१८%)च्या घसरणीचे बोलायचे झाल्यास एका दिवसात गुंतवणुकदारांची संपत्ती ११.४३ लाख कोटी रुपये कमी झाली. बुधवारी बीएसईचे बाजार भांडवल १,३७.१४ लाख कोअी रु. होते. इंट्रा-डे व्यवसायादरम्यान सेन्सेक्सने विक्रमी स्पर्श केला.देश-विदेशातील शेअर बाजारांतील विक्रीमागे कोराेनाशिवाय मोठी कारणे


1. कोरोना वायरस महामारी घोषित: डब्लूएचओने कोरोना विषाणूस महामारी जाहीर केल्याने जागतिक अर्थव्यवस्था मंदीत येण्याची शक्यता वाढली.
 


2. प्रवासबंदी : डब्लूएचओच्या घोषणेनंतर अमेरिकेने ब्रिटन वगळता युरोपच्या अन्य देशांना अमेरिकेत येण्यास ३० दिवस बंदी घातली आहे.
3. विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री: एफआयआय २४ फेब्रुवारीपासून विक्री करताहेत. मार्चमध्ये भारतीय बाजारातून २०,८३१ कोटी रु. काढले.
4. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण: अमेरिकेचा डाऊ जोन्स निर्देशांक विक्रमी १,४६४ अंक घसरून बंद झाला. आशियाई बाजारात मोठी घसरण नोंदली.

स्टॉक मार्केट : घसरणीनंतर,पोर्टफोलिओ सुधारण्यास संधी


गुरुवारचा दिवस बाजारात खूप भयावह राहिला. एका दिवसात ११ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल साफ झाले. जागतिक स्तरावर गेल्या दोन महिन्यांत बाजाराला ५ लाख कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे. अॅसेट प्राइसमध्ये अशा प्रकारची घसरण आर्थिक संकटास जन्म देऊ शकते आणि ही स्थिती भीतीदायक आहे. चीनमध्ये जेव्हा गेल्या महिन्यात कोरोना विषाणू पसरल्यावर तेथील सरकारने बाजाराचे नुकसान टाळण्यासाठी खूप स्मार्ट पद्धतीने काम केले आहे. चीनने बाजारात शॉर्ट सेलिंगला नियंत्रणात ठेवले. असे असले तरी चीन एक बिगर लोकशाहीवादी देश आहे. चीनच्या उपायांचा परिणामही दिसत आहे. एकीकडे जागतिक बाजारात १५-२० टक्के नुकसान झाले. चीनच्या बाजारात केवळ ०.१० टक्के नुकसान झाले आहे. यासोबत चीनची बाजारपेठ संपत्ती ४.७६ लाख कोटी डॉलरच्या स्तरावर स्थिर राहिली. हे लक्ष ठेवा की, कोणत्याही देशाची मार्केट वेल्थ तेथील बाजार भांडवलात दिसते. त्यामुळे याची सुरक्षा खूप आवश्यक आहे. अशा स्थितीत  जेव्हा बाजारात असे नुकसान होऊ शकते तेव्हा वसुलीसाठी किती वेळ लागतो यावर लक्ष { १९९२ मध्ये सेन्सेक्स एका वर्षात ५४% घसरले. याच्या पुढील १.५ वर्षात याने १२७% ची वसुली केली.> १९९६ पासून पुढील चारमध्ये ४०% घसरण आली. मात्र, येत्या एका वर्षात ११५% ची वसुली आली.
>  २००० पासून येत्या १.५ वर्षात ५६% घसरण आली. येत्या २.५ वर्षांत १३८ टक्क्यांची वसुली केली.
> २००८ मध्ये एका वर्षात ६१% घसरण राहिली. त्याच्या पुढील १.५ वर्षात १५७ वसुली.
> २०१० मध्ये २८% घसरण राहिली. येत्या तीन वर्षांत ९६% वसुली राहिली. २.५ महिन्यांत सुमारे २२% घसरण राहिली. 
> २०१५ मध्ये एका वर्षांत २५% घसरण राहिली. पुढील २ वर्षांत ६२% वसुली झाली.
> मार्च २०२० : गेल्या २.५ महिन्यात सुमारे २२% घसरण राहिली. पुढे काय होईल?
> शॉर्ट आणि मीडियम टर्म(४ ते ६ महिने)मध्ये २०%ची वसुली शक्य आहे. १८-२० महिन्यांत बहुतांश प्रकरणांत १०० टक्के वसुली होते. ट्रेडवर लक्ष दिल्यास या वेळी रिकव्हरी न होण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. आम्ही सर्वश्रेष्ठाची अपेक्षा करतो. सध्याच्या स्थितीत आपल्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचा आढावा घेणे आवश्यक आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये दर्जेदार समभागाचा समावेश करण्याची संधी चुकवू नये.
दिले पाहिजे. तुम्हीही वाचा...घाईत विक्री करणे टाळले पाहिजे


शेअर बाजारात अजूनही घसरणीचा कल कायम राहू शकताे. पुढील काही दिवसांत सेन्सेक्स अाणि निफ्टी घसरून अनुक्रमे ३१ हजार अाणि ९ हजार अंकांच्या अासपास स्थिर हाेऊ शकताे. अाताही मजबूत पाया असलेल्या दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. अाता हे अाकर्षक किमतीमध्ये उपलब्ध अाहेत.  
 - नीलेश करनी, उपाध्यक्ष, मॅग्नम इक्विटी 
 


>  मंगळवारच्या अगाेदर बाजारात सुधारणा हाेण्याची शक्यता कमी आहे. शुक्रवारी आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी रिकव्हरी फार हाेत नाही. त्यानंतर एसबीआय कार्ड कशी कामगिरी करते हे बघावे लागेल. सध्या समभाग विक्री करू नका. आधीच नुकसान झाले आहे व विक्रीच्या माऱ्याने आणखी नुकसान हाेईल. 
- अरुण केजरीवाल, मार्केट अॅनालिस्ट.
 

 

बातम्या आणखी आहेत...