आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BSE Sensex Today Budget 2020 | Stock Market Nirmala Sitharaman Budget 2020 Announcement News Updates On Share Stock Market Trade BSE, Nifty, Sensex Live News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेंसेक्समध्ये 182 अंकांच्या भरारीनंतर चक्क 480 अंकांनी घसरण, 40242 पर्यंत पोहोचला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई - अर्थसंकल्पामुळे शेअर मार्केट शनिवारी सुद्धा सुरू ठेवण्यात आले. बजेटच्या घोषणांसह बाजारात चढ-उतार सुरूच होते. सुरुवातीला सेंसेक्समध्ये 279 अंकांची घसरण झाली. यानंतर काही प्रमाणात बाजार सावरले आणि 182 अंकांनी वधारले. परंतु, यानंतर बजेट भाषणातून अपेक्षा भंगल्याचे या चढ-उतारातून दिसून आले. यासोबतच, बाजारात 481 अंकांची घसरण आली आणि 40,242 इतके पोहोचले. विशेष म्हणजे, शुक्रवारी सेंसेक्स 40,723.49 वर बंद झाले होते. निफ्टीमध्ये सुद्धा ही घसरण दिसून आली. निफ्टीचा आकडा 144.60 अंकांच्या घसरणासह 11817.50 इतक्या अंकांवर होता.


अर्थसंकल्पातील घोषणांमुळे शेअर मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळतात. यापूर्वी 2015 मध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार होता. त्या दिवशी सुद्धा शेअर मार्केट सुरू ठेवण्यात आले होते. सामान्य दिवसांमध्ये शनिवार आणि रविवारी शेअर मार्केट बंद असतो. सरकार दीर्घकालीन भाग भांडवलमधून मिळणाऱ्या नफ्यावरील करांमध्ये दिलासा देऊ शकते. शेअर खरेदीच्या एका वर्षांनंतर विकल्यास जर एका लाखाचा नफा होत असेल तर त्यावर सध्या 10% कर लादले जाते. यावेळी सरकार हा कर समाप्त करणार किंवा ही मर्यादा वाढवून 2 वर्षे केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. डिव्हिडंट डिस्ट्रीब्युशन टॅक्सच्या नियमांमध्ये सुद्धा बदल अपेक्षित आहेत.