आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BSE Sensex Today | Stock Market : March 9 Share Market, Trade BSE, Nifty, Sensex Live News Updates

सेंसेक्स 1463 अंकांनी कोसळला, फेब्रुवारी 2019 पासून निफ्टीची सर्वात खराब कामगिरी; बीएसई 2020 मध्ये 5178 अंकांनी खाली आला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निफ्टी 409.45 अंकांनी घसरून 10,580 अंकांवर पोहोचला
  • येस बँकेचे शेअर 19.14% वाढून 19.30 रुपयांवर पोहोचले

मुंबई - आज(सोमवार) सेन्सेक्समध्ये घरसण सुरु आहे. कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढण्यासोबतच क्रूड ऑईलच्या किमती कमी झाल्याने जगभरातील शेअरबाजार कोसळले. सौदी अरेबियातील तेलाच्या किमतीत घरसण झाल्याच्या घोषणेनंतर क्रूड ऑईलच्या किंमती 30% कमी झाल्या. याचा परिणाम भारतीय बाजारांत पाहायला मिळाला. सेन्सेक्स 3.90% म्हणजेच 1463.76 अंकांनी खाली घसरत 36,112.86 अंकावर थांबला आहे. तर निफ्टी 409.45 अंकांनी खाली कोसळत 10,580 अंकावर आला आहे. निफ्टीचा हा फेब्रुवारी 2019 नंतर खालचा स्तर आहे. तसेच ऑगस्ट 2015 नंतर एका दिवसातील सर्वात खराब प्रदर्शन आहे. 

सुरूवातीच्या व्यापारात सेन्सेक्स 1152.35 अंकांनी खाली आला


यापूर्वी सुरुवातीला सेन्सेक्स 1152.35 अंकांनी खाली येऊन सुरू झाला. सेन्सेक्स तब्बल 3.07% खाली राहिला. बाजार 36,424.27 अंकांवर पोहोचला आहे. येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. बँकेचे शेअर 19.14% वर 19.30 रुपयांवर व्यापार करत आहेत. याप्रकारे निफ्टी 326.50 अंकांनी खाली येत 10,662.95 अंकांवर थांबली आहे. निफ्टीत ओएनजीसी, वेदांता, रिलायन्स, इंडसइंडच्या शेअर्समध्ये घरसण दिसत आहे. तर येस बँक, बीपीसीएल, एशियन पेंट्स, आयओसीच्या शेअर्समध्ये वाढ पाहण्यास मिळत आहे. 2020 मध्ये सेन्सेक्स 2 महिन्यांत 12.53% घसरला


2020 मध्ये 1 फेब्रुवारीपासून आतापर्यंत सेन्सेक्स अंदाजे 12.53% खाली आला आहे. 1 जानेवारी रोजी सेन्सेक्स 41,306 अंकांवर होता. 9 मार्च रोजी सेन्सेक्स 36,128 अंकांवर आला आहे. आकडेवारी विषयी सांगायचे तर सेन्सेक्स 5,178 अंकांनी खाली आला आहे. याप्रकारे निफ्टी 1,602 अंकांनी खाली आला आहे. 1 जानेवारी रोजी निफ्टी 12,182 अंकांवर होता. 9 मार्च रोजी निफ्टी 10,580 अंकांवर पोहोचला आहे. बातम्या आणखी आहेत...