आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएफमध्ये निकृष्ट जेवणाची तक्रार करणाऱ्या व्हायरल जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्येच्या दिशेने तपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेवाडी - बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थातच बीएसएफ जवान तेज बहादुर यादवचा मुलगा रोहित (22) याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. माजी सैनिक तेज बहादुर काही दिवसांपूर्वीच बीएसएफमध्ये निकृष्ट जेवणाची तक्रार करून व्हायरल झाला होता. त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करून नोकरीवरून काढण्यात आले. त्याच जवानाच्या मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्याचा मुलगा रोहित घरात एकटाच होता. तसेच घटनास्थळावरून एक परवाना असलेली पिस्तुल सुद्धा सापडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येचा अंदाज लावला असून पुढील तपास सुरू आहेत.


पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित तेज बहादुरचा एकुलता एक मुलगा होता. तसेच तो बीएससीच्या द्वितीय वर्षात शिकत होता. तेज बहादुर प्रयागराजच्या कुंभ मेळ्यात गेला होता. घटनेच्या दिवशी त्याची आई शर्मिला सुद्धा ड्युटीवर होती. ती एका खासगी कंपनीत काम करते. तसेच दार आतून बंद होते. खिडकीतून शेजाऱ्यांनी पाहिले असता रोहितचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसून आला.


मॅगझीन वेगळी पडल्याने स्टंटचा संशय
रोहितला डोक्यात उजवीकडून गोळी लागली. पिस्तुलचे मॅगझीन पिस्तुलापासून वेगळे पलंगावर होते. एका पोलिस अधिकाऱ्याने त्यामुळेच स्टंटबाजीचा संशय व्यक्त केला आहे. त्याने सुरुवातीला मॅगझीन बाहेर काढले आणि स्वतःला गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असवा. परंतु, एक गोळी पिस्तुलात आधीच लोडेड असल्याने ती त्याच्या डोक्यात झाडली गेली. गतवर्षी जानेवारी महिन्यात काश्मीरच्या सीमेवर तैनात असताना बीएसएफ जवान तेज बहादुर यादवचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याने बीएसएफ जवानांना निकृष्ठ जेवन मिळत असल्याची तक्रार केली होती. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रिपोर्ट मागितला होता.

बातम्या आणखी आहेत...