आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL आणि प्राइव्हेट टेलीकॉम कंपनी Vodafone-IDEA ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षांची भेट देताना या सेवेला पूर्णपणे मोफत केले आहे. या कंपनीच्या ग्राहकांना त्यासेवेसाठी कोणत्याही प्रकराचे पैसे देण्याची गरज नाहीये. रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी घेतला हा मोठा निर्णय.
या सेवेवर नाही लागणार चार्ज
BSNL आणि Vodafone-IDEA कडून ग्राहकांसाठी ब्लॅकआउट डेज चार्जला संपवले आहे. यानुसार या कंपनीच्या ग्राहकांना 31 डिसेंबर, 1 जानेवारी सोबतच इतर फेस्टीवलला मेसेज पाठवण्यासाठी जास्तीचा चार्ज देण्याची गरज नाहीये.
जिओला टक्कर देण्यासाठी केले असे
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायंस जियो आपल्या ग्राहकांना रोज कॉलिग, डाटा आणि मेसेजची सेवा फ्री देते. फेस्विट सीजन आणि ब्लॅक आउट डेजलाही ग्राहकांकडून जास्तीचा चार्ज घेतला जात नाही. पण आता जिओला टक्कर देण्यासाठी BSNL आणि Vodafone-IDEA ने आपल्या ग्राहकांसाटी हे सेवा फ्री केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.