आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएलची स्वेच्छा निवृत्ती याेजना जाहीर, 80 हजार कर्मचाऱ्यांना लाभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • योजना 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत, 1 लाख कर्मचारी ठरतील पात्र
  • बीएसएनएलकडे विद्यमान आहे 1.5 लाख कर्मचारी संख्याबळ
  • आतापर्यंत पूर्ण झालेला सेवा कार्यकाल व उर्वरित वर्षे या आधारावर ठरेल रक्कम

​​​​​​नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या दूरसंचार कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एेच्छिक सेवानिवृत्ती याेजना (व्हिआरएस) जाहीर केली आहे. या याेजनेतून ७० हजार ते ८० हजार कर्मचाऱ्यांना लाभ हाेऊ शकेल व या वेतनातून जवळपास ७,००० काेटी रुपयांची बचत हाेईल, अशी कंपनीला आशा आहे. सरकारने या दूरसंचार कंपनीसाठी दिलासा पॅकेजला मंजुरी दिल्यानंतर काही दिवसातच व्हिआरएस याेजना आणली आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.के. पुरवार म्हणाले, याेजना चार नाेव्हेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत खुली असेल. व्हिआरएस याेजनेबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी विभागीय कार्यालयांना याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या १.५० लाख आहे आणि जवळपास एक लाख कर्मचारी याेजनेसाठी पात्र आहेत. पुरवार म्हणाले,सरकार व बीएसएनएळने दिलेली ही सर्वाेत्तम याेजना आहे.

५० वर्षे वा त्यापेक्षा जास्त वयाचे कर्मचारी करू शकतात अर्ज
बीएसएनएल व्हीआरएस योजने ५० वर्ष वा त्यापेक्षा जास्त वयाचे सर्व कायम कर्मचारी व्हिआरएससाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. यात त बीएसएनएलच्या बाहेरच्या संघटनेत प्रतिनियुक्तीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांही समावेश आहे. पात्र कर्मचाऱ्यांंसाठी सानुग्रह रक्कम पूर्ण केलेल्या प्रत्येक सेवा वर्षाच्या बदल्यात ३५ दिवस तसेच उर्वरित कालाधीसाठी २५ दिवसांच्या वेतना प्रमाणे असेल.

सरकारने केली हे ६९ हजार काेटी रुपयांच्या पॅकेजची घाेेषणा
सरकारने गेल्या महिन्यात बीएसएनएल व एमटीएनएलसाठी ६९,००० काेटी रुपयांच्या पुरुज्जीवन पॅकेजची घाेेषणा केली . यामध्ये ताेट्यात असलेल्या दाेन्ही सरकारी दूरसंचार कंपन्यांचे विलिनीकरण, त्यांनी संपत्ती बाजारात आणणे तसेच कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देणे याचा समावेश आहे. याचा उद्देश विलिनीकरणानंतर दाेन्ही कंपन्यांना दाेन वर्षात फायदा देण्याचा आ​​​​​​​हे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एमटीएनएल व बीएसएनएलच्या विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे. एमटीएनएल मुंबई व नवी दिल्लीत सेवा देते. बीएसएनएल देशाच्या अन्य भागात सेवा देते.

३ डिसेंबरपर्यंत एमटीएनलची योजना कर्मचाऱ्यांसाठी खुली
महानगर टेलिफोन निगम लि.नेे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस याेजना लागू केली आहे. ही याेजना तीन डिसेंबरपर्यंत आहे. एमटीएलएनने जाहीर केलेल्या नाेटीसमध्ये ३१ जानेवारी २०२० पर्यंत ५० वर्ष पूर्ण झालेले वा त्यापेक्षा जास्त वयाचे सर्व कायम व स्थायी कर्मचारी या याेजनेसाठी पात्र असतील असे म्हटले आहे. माेठ्या संख्येने कर्मचारी लाभ घेतील अशी दाेन्ही कंपन्यांना अपेक्षा आहे.