आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएलचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रमचे वाटप करावे, पेन्शन रिव्हिजन, पेन्शन अंशदान मूळ वेतनावर व्हावी या प्रमुख मागण्यांसह प्रलंबित इतर मागण्यासाठी 'ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएलतर्फे सोमवारपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. 

 

दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी बीएसएनएल कर्मचाऱ्यांना देय असलेला तिसरा वेतन करार लागू करण्याबाबत तसेच बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रमचे देण्यासंबंधी आश्वासन दिले होते; परंतु आठ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अजूनपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम न मिळाल्याने ग्राहकांना अपेक्षित वेगवान इंटरनेट सेवा देता येत नाही. कर्मचाऱ्यांचे हक्क व ग्राहकांना वेगवान फोर-जी सेवा मिळावी यासाठी बीएसएनएलमधील सर्व युनियन व असोसिएशनद्वारे विविध मागण्यासाठी देशव्यापी बेमुदत संप पुकारलेला आहे. 


सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हा संप १०० टक्के यशस्वी करावा, असे आवाहन ऑल युनियन अँड असोसिएशन =ने केले अाहे. यास नीलेश काळे, प्रदीप सोनवणे, बी. पी. सैदाणे, प्रदीप चांगरे, अभिजीत पाटील सहकार्य करत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...