आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'BSNL'ने ग्राहकांसाठी आणला सर्वात स्वस्त प्लॅन; फक्त 36 रुपयांत मिळेल 6 महिन्यांची व्हॅलिडीटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने ग्राहकांसाठी नविन प्लॅन सादर केला आहे. त्यामुळे दरमहिन्याला रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी नविन प्लॅन अत्यंत उपयोगी आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनअंतर्गत 6 महिन्यांचा व्हॅलिडीटी दिली जाणार आहे.  
 
हा आहे नविन रिचार्ज
बीएसएनएलने ग्राहकांसाठी जास्त व्हॅलिडीटी असणारे दोन नविन रिचार्ज पॅक सादर केले आहे. या रिचार्जची किंमत 36 आणि 37 रुपये असून या रिचार्जवर ग्राहकाला 6 महिन्यांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. या 36 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकाला 50 एमबी इंटरनेट डेटा मोफत मिळणार आहे. परंतू या दोन्ही रिचार्जमध्ये ग्राहकाला कोणताही टॉकटाइम बॅलन्स मिळणार नाही.


आता नाही करावा लागणार दरमहिन्याला रिचार्ज
सध्या सर्व टेलिकॉम कंपन्यानी आपल्या ग्राहकांना इनकमिंग कॉलची सुविधा सुरू ठेवण्यासाठी कमीत कमी 35 रुपयांचा रिचार्ज ठेवण्याची अट ठेवली आहे. तसे न केल्यास कंपन्यांकडून ग्राहकाची इनकमिंग आउटगोइंग सुविधा बंद केली जाते. परंतू बीएसएनएलच्या नविन रिचार्जअंतर्गत ग्राहकांना 6 महिन्यांची व्हॅलिडीटी असल्यामुळे सारखा रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही.

 

बातम्या आणखी आहेत...