आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्याने केला बलात्कार, घाबरलेल्या मुलीने घरी आल्यावर आईला सांगितला सगळा प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्ग(छत्तीसगड)- शेजाऱ्याच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेलेल्या 4 वर्षीय चिमुकलीवर आरोपी जयरामने अत्याचार करून फरारा झाला. या गरिब मुलीची चुकी इतकीच होती की, ती आपल्या घरा टीव्ही नव्हता म्हणून शेजाऱ्याच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जायची. पण दर वेळी ती आपल्या आईसोबतच टीव्ही पाहण्यासाठी जायची, पण गुरुवारी आईला काहीतरी काम असल्याने चिमुकली एकटीच गेली. यावेळी घरात कुणी नसल्याचे पाहून आरोपीने आत्याचार केला. पोलिसांनी पोस्को अॅक्टच्या अंतर्गत आरोपीला बेड्या ठोकल्या.


मुलीची आई म्हणाली- खूप घाबरली आहे ती
चिमुकलीच्या आईने पोलिसांना सांगितले की, झोन-2 आमचे कुटुंब दोन वर्षांपासून किरायाच्या घरात राहते. आरोपी जयरामच्या आईचा स्वभाव चांगला असल्यामुळे घरचे चांगले संबंध बनवले. त्यामुळे आरोपीची आई मुलीसाठी टीव्ही लावायची. त्यामुळेच मुलगी रोज टीव्ही पाहण्यासाठी आरोपीच्या घरी जायची. गुरुवारी संध्याकाळी 5.30 मुलगी आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली. पण संध्याकाळी 6 वाजतो ती परतली आणि कमजोर स्थितीत घरातील बेडवर पडली. त्यानंतर आईने विचारल्यावर मुलीने घडलेला सगळा प्रकार सांगितला. मुलीला कळाले होते की आपल्यासोबत काहीतरी वाईट झाले आहे.


आरोपीला गांजा आणि भांगेचे आहे व्यसन
आरोपीच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, तो बीएसपीमध्ये मजुरी करोत. आरोपी नेहमी संशयास्पद राहीलेला आहे. 6 भावंडात सगळ्यात मोठा असूनदेखील त्याला आपल्या जबाबदाऱ्या कळत नाहीत. याशिवाय त्याला गांजा आणि भांग खाण्याचे व्यसन आहे. त्यामुळेच परिसरातील लोक त्याच्या जास्त नादाला लागत नाहीत. चिमुकलीच्या आईने सांगितले की, घटनेनंतर ती जेव्हा आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली, तेव्हा आरोपीचे डोळे लाल दिसत होते.