आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसपाच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण, निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- लोकसभेच्या निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचा आरोप करत, पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचे समोर आले आहे. अमरावतीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजने यांच्यासह अन्य नेत्यांना कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्क्यांसह खुर्च्या फेकून मारहाण केली. 

 

बुहजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजणे, राष्ट्रीय महासचिव सुरेश रैना, कृष्णा बेले प्रदेश महासचिव, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार या नेत्यांना मारहाण झाली आहे. अमरावती येथील शासकीय विश्रामगृहावर हा सर्व राडा झाला. 

 

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत बसपाच्या नगरसेवकांनी पैसे घेऊन भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांना मतदान केल्याचा आरोप आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या नेत्यांनी पक्ष विकल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळेच नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावर बसप पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होताच, त्यांच्यावर खुर्च्या फेकून मारल्या आणि कपडे फाडून मारहाण केली. 

बातम्या आणखी आहेत...