आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरवर मोदी सरकारच्या निर्णयाचे बसप सुप्रिमो मायावतींनी केले समर्थन, विरोधकांवर केली टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - जम्मू आणि काश्मीरातून कलम 370 हटवल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे बसप सुप्रिमो मायावतींनी समर्थन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमीच देशात समता, एकता आणि अखंडतेच्या पक्षात होते. त्यामुळेच, त्यांनी जम्मू-काश्मीरात कलम 370 चा विरोध केला होता. त्यामुळेच, संसदेत हे कलम हटवण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचे बहुजन समाज पक्षाने समर्थन केले आहे. असे मायावतींनी ट्विट करून सांगितले आहे. मायावतींनी आपल्या ट्विटमध्ये केवळ सरकारच्या निर्णयाला पाठिंबाच दिला नाही, तर त्यास विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर सुद्धा खडेबोल सुनावले आहेत.

काश्मीरात जाणाऱ्या विरोधकांचा घेतला समाचार
> मायावती आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, "देशात राज्यघटना लागू झाल्याच्या 67 वर्षांनंतर कलम 370 हटवण्यात आली आहे. तेथील (काश्मीरातील) परिस्थिती सामान्य होण्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल. त्याची प्रतीक्षा करणे हेच सर्वोत्तम राहील. हीच गोष्ट सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केली आहे."
> मायावतींनी पुढे सांगितले, की "अशा परिस्थितीत सुद्धा कुठलीही परवानगी न घेता काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते काश्मीरमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. असे करून विरोधक काश्मीरचे राज्यपाल आणि मोदी सरकारला राजकारण करण्याची संधी देत आहेत. तेथे जाण्यापूर्वीच या गोष्टींचा विचार केला असता तर योग्य ठरले असते."

बातम्या आणखी आहेत...