आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी, शहांची झोप उडवणार, काँग्रेसचा आम्हाला फायदा नाही; सप, बसपच्या आघाडीची घोषणा करताना मायावती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी उत्तर प्रदेशात आघाडीची अधिकृत घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना, ही पत्रपरिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडवणारी ठरेल असे मायावतींनी ठणकावले. सोबतच, लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी अखिलेश यांनी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेशात काँग्रेसला त्यांच्या हक्काच्या दोन जागा देणार असे म्हटले होते.

 

 

Mayawati: BSP will contest on 38 seats, SP on 38 seats. Two Lok Sabha seats we have left for other parties and Amethi and Rae Bareli have been left for Congress. pic.twitter.com/lsdCdxKNah

— ANI (@ANI) January 12, 2019

 

सप-बसप 38-38 तर काँग्रेसला 2 जागा...

- बसप सुप्रीमो मायावती यांनी यांनी सांगितल्याप्रमाणे, "1993 मध्ये बसपचे प्रमुख कांशी राम आणि सप प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी दोघांना यूपीच्या निवडणुकीत विजय मिळाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर जाऊन अशाच स्वरुपाचे निकाल आता आम्ही देणार आहोत." असा संकल्प मायावतींनी घेतला आहे.

- उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. त्यापैकी  सप आणि बसप या दोन्ही पक्षांनी लोकसभेच्या 38-38 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला 2 जागा आणि उर्वरीत दोन छोट्या पक्षांना दिल्या जाणार आहेत. काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोन हक्काच्या जागा दिल्या जात आहेत. जेणेकरून भाजप काँग्रेसच्या अध्यक्षांना या दोन जागांवर अडकून ठेवू शकणार नाही. सोबतच, भाजपचा अहंकार मोडण्यासाठी बसप आणि सप एकत्रित येणे आवश्यक होते असे मायावतींनी स्पष्ट केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...