आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्ध जयंती/ संशयामुळे पती-पत्नीचे नाते, दोन मित्रांची मैत्री किंवा प्रेमाचे नाते नष्ट होऊ शकते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलीजन डेस्क- आज तथागत गौतम बुद्धांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे. भगवान गौतम बुद्धांनी 'बौद्ध' धर्माची स्थापना केली. तसेच हिंदू धर्मातही बुद्धांना भगवान विष्णूंचा नववा अवतार मानले जाते. तथागतांनी आपल्या प्रवचनामध्ये सुखी आणि यशस्वी आयुष्याचे रहस्य सांगितले आहे. त्यामुळे आपण आपल्या अडचणींना दूर ठेवण्यासाठी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या या अनमोल विचारांचे पालन केले पाहिजे. जाणून घ्या गौतम बुद्धांचे 10 मौल्यवान विचार...


> तथागत सांगतात की, कोणत्याही व्यक्तीची 'संशय' करण्याची सवय खूप घातक आहे. संशयामुळे लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो. ही सवय पती-पत्नी, मैत्री, आणि प्रेमाचे नाते संपुष्टात आणते. त्यामुळे अशा सवयीपासून दूर राहावे.

> जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमुळे रागात येतो तेव्हा सत्याचा मार्ग सोडण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत क्रोधित व्यक्ती स्वार्थी बनतो आणि फक्त आपले म्हणने पटवून देत असतो. म्हणून आपण रागापासून दूर राहावे.

> ईर्शा आणि द्वेषाच्या भावनेमुळे आयुष्यात आपल्याला कोणताच आनंद मिळत नाही. या सर्व भावना आपल्या मनाची शांती नष्ट करतात. म्हणून सदैव शांत मनाने विचार करावा.

> अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलासारखा असतो त्याला कोणत्याही गोष्टीचे काही देणेघेणे नसते. तो फक्त आकाराने वाढलेला असतो, बुद्धिने नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना दुर ठेवावे.

> नेहमी रागात असणे म्हणजे समस्यांना अवाहन देण्यासारखे आहे. कारण यात नुकसान आपलेच आहे. त्यामुळे व्यक्तीने शांत मनाने काम करावे.

> या संपुर्ण जगात आनंद आणि सुख कधीच एकसारखे नसते टिकत नाही तसेच, दुःखसुद्धा अधिक काळ राहात नाही. जर आपण संघर्ष करत असाल तर नक्कीच आशेची किरण सापडेल. त्यामुळे कधीच प्रयत्न करणे सोडू नका.

> भुतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार कधीच करू नये. आणि भविष्याचे स्वप्न पाहू नये. त्याऐवजी आपले मन वर्तमान काळात केंद्रित करा.

> आयुष्यभर फक्त ध्यान करून काहीच साध्य होणार नाही. म्हणून एक दिवस तरी समाधानाने जगा.

> आपण कधीच आपल्या रागामुळे दंड मिळत नसतो तर आपला रागच एक दंड असतो.

> प्रत्येक व्यक्ती स्वतः आपल्या आजाराला कारणीभुत आहे. त्यामुळे व्यक्तीने आपल्या दैनंदिन आहाराची काळजी घेतली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...