आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वर्षे जुने झाड कापण्यापूर्वी बौद्ध भिक्षुकांनी माफी मागितली, भावूक चिठ्ठी लिहून व्यक्त केल्या भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झाड कापण्यापूर्वी बौद्ध भिक्षुकांनी त्यावर बसणाऱ्या पक्षांसाठी भावूक चिठ्ठी लिहीली

कॅलिफोर्निया- अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात 100 वर्षे जुने झाड कापण्यापूर्वी त्याची सन्मानपूर्ण पाठवणी करण्यात आली. बर्कलेच्या बेनक्राफ्ट स्ट्रीटवर लगा "फर"चे हे झाड आतून पूर्णपणे सडले होते. कधीही हे झाड पडण्याचा धोका होता. यामुळे एखादी जीवितहानी होऊ शकत होती. त्यामुळेच, झाडाशेजारी असलेल्या बौद्ध भिक्षुकांच्या मठाने याला तोडण्याचा निर्णय घेतला.


झाड कापण्यापूर्वी एक मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात या झाडावर राहणाऱ्या पक्षांसाठी आणि किटांसाठी एक भावूक चिठ्ठी लिहीण्यात आली. 

'आम्हाला तुमच्याप्रती कृतज्ञता आहे' 
 
चिट्‌ठीमध्ये लिहीण्यात आले की, "तुम्ही निस्वार्थ भावाने एका शतकांपेक्षा जास्त काळ लोकांना सावली आणि आश्रय देण्याचे काम केले. यासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुमच्या आत्माला शांती मिळो. या झाडांवर ज्यांचे घर आहे, त्यांनी लवकर दुसऱ्या ठिकाणी घराची व्यवस्था करावी. तुमच्या कुटुंबाला होणाऱ्या त्रासासाठी आम्ही माफी मागतो. तुम्ही नेहमी आठवणीत राहाल."