आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Budget 2019: 3 Challenges To The Economy; Jobs Disappear, NPA Drops, 5 year Plan For Infrastructure

Budget 2019 : अर्थव्यवस्थेसमोरील ३ आव्हाने ; नोकऱ्या गायब, एनपीए घसरला, पायाभूत सुविधांसाठी ५ वर्षांची योजना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावर जोर असेल, अशी अपेक्षा हाेती. कारण यातूनच बेराेजगारीसारख्या समस्येवर तोडगा निघू शकताे; परंतु या अर्थसंकल्पात रोजगाराचा स्पष्ट उल्लेख नाही. अर्थमंत्र्यांनी स्वयंराेजगारावरच लक्ष केंद्रित केलेय.

 

....अल्लाउद्दीनच्या जिनचा शोध : बेरोजगार अल्लाउद्दीनपासून नोकऱ्यांचा चिराग दूर
भारतात बेरोजगारीचा दर ६.१% वर आहे. मात्र, तरीही  या अर्थसंकल्पात याचा त्राेटक उल्लेख अाहे. चीनमध्ये हा दर ३.६७ % आहे. आपल्याला माहीतच असेल की अल्लाउद्दीन हे चिनी पात्र आहे. तो ही बेरोजगार होता. चीनने यावर उपाय शोधले असून आपल्या बेराेजगारांना अजून अशा जिनचा शोध आहे. 

या अर्थव्यवस्थांमध्ये बेरेाजगारीचा दर 
अमेरिका    3.8%
चीन    3.8%
जपान    2.4%
जर्मनी    3.4%
ब्रिटन    4.2%

 

..वेताळच्या प्रश्नांना उत्तरेच नाहीत...एनपीएचा वेताळ प्रत्येक राजावर आजपर्यंत आरूढ 
भारतात अनेक वर्षांपासून प्रत्येक राजावर, प्रत्येक अर्थमंत्र्यावर  वेताळरूपी एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट्स) चे ओझे आहेच. या वेळी भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, मागील चार वर्षात चार लाख कोटी रुपयांच्या एनपीएची वसुली झाली आहे. मागील एका वर्षात एनपीए एक लाख कोटी रुपयांनी कमी झाला आहे. 

 

वर्षानुवर्षे वाढतच गेला एनपीए 
2009    44000
2014    292193
2015    437859
2016    697409
2019    806412

 

...जेरीबराेबर इन्फ्रावर टॉम स्वार : इन्फ्रास्ट्रक्चर उंदरासारखे, त्यावर ओझे मांजरीसारखे

बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर आगामी ५ वर्षात  १०० लाख कोटी रुपये खर्चाचा विषय आला आहे. एका अभ्यासानुसार भारत जर जीडीपीचा अतिरिक्त १% खर्च करताे, तो १३.६ लाख नव्या नोकऱ्या येऊ 
शकतात. म्हणजे, सध्याचा खर्च तुलनेत केवळ १ % पायाभूत सुविधा बनवण्यावर वाढवला पाहिजे.

 

जीडीपीच्या १% खर्चाने नव्या नोकऱ्या

अमेरिका    730000
चीन    2,400,000
जपान    211,000
जर्मनी    157,000
ब्रिटन    343,000

 

 

बातम्या आणखी आहेत...