आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Budget 2019 News And Update About Aam Budget Presented By Acting Finance Minister Piyush

BUDGET2019: प्राप्तीकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, 5 लाखांपर्यंत उत्पन्न \'टॅक्स फ्री\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोदी सरकार आपल्या कार्यकाळातील सहावा आणि अंतिम अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहे. प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवला आहे. मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे करमर्यादा अडीच लाखांवरून थेट पाच लाख करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरदार, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 3 कोटी करदात्यांना लाभ मिळणार आहे. 40 हजारापर्यंत व्याजही करमुक्त करण्यात आले आहे.80 सी अन्वये वजावटीची मर्यादा 1 लाख 50 लाख रुपये कायम ठेवण्यात आली आहे. 10 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 20 टक्के, तर दहा लाखांवरील उत्पन्न असलेल्या करदात्यांना 30 टक्के कर भरावा लागत होता. 20 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटीवर आता कर लागणार नाही. पूर्वी ही मर्यादा दहा लाखांपर्यंत होती. दुसरीकडे, स्टँडर्ड डिडक्शन टॅक्स  40 हजारांवरुन वाढवून 50 हजारांवर नेण्यात आली आहे. पोस्ट आणि बँकांमधील बचतीवरील 40 हजारांपर्यंतचे व्याज करमुक्त होणार आहे. पूर्वी ही मर्यादा केवळ 10 हजार रुपयांची होती.

 

यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरी, नोकरदारवर्ग केंद्रित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने कामगार क्षेत्रावर विशेष भर दिला आहे. सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविली, आता 20 लाख रुपये मिळणार आहे.

 

अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरु आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला आहे. आपल्या भाषणात सांगितले की, सरकारने मागील 5 वर्षात देशाचा आत्मविश्वास वाढवला आहे. वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था आपल्या देशाची आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश आले असून भारत पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर आहे. नव्या भारताच्या दिशेने वाटचाल आहे.

बातम्या आणखी आहेत...