आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Budget 2019: Rebate Income Up To 1.50 Lakh Only On The Purchase Of A Single E vehicle

Budget 2019 : केवळ एकाच ई-वाहन खरेदीवर १.५० लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकरात सवलत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी २.० सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात कर-शुल्क, गुंतवणूक व बचतीबद्दल अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत. 3 मोठ्या घोषणांशी संबंधित उत्तरे खालीलप्रमाणे ....

 

1. मला ३.५ लाख व्याजाची सूट घ्यायची असेल तर मी हे घर कधीपर्यंत खरेदी करू शकतो? अटी काय आहेत?
> परवडणारे घर खरेदी करण्यासाठी कलम-२४ अंतर्गत २ लाख रुपये व्याज सवलत सध्या मिळत आहे. ही वाढवून सरकारने ८०-ईईएअंतर्गत १.५ लाख रुपयांची अतिरिक्त व्याज सवलत दिली आहे. यासाठी ३ अटी आहेत. गृह कर्ज १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या काळात घेतलेले असावे. दुसरे, घराची किंमत ४५ लाखांपेक्षा जास्त नसावी. घर खरेदी करण्याच्या तारखेपर्यंत दुसरे घर खरेदी केलेले नसावे. 


2. अर्थसंकल्पाच्या घोषणेचा लाभ घेण्यासाठी मी किती रुपयांपर्यंतचे इलेक्ट्रिक वाहन घेऊ शकतो?
> इलेक्ट्रिक वाहन कर्जावर १.५ लाख रुपये व्याजाची अतिरिक्त सूट मिळेल. यासाठी तुम्हाला वाहन १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या काळात खरेदी करावे लागेल. तुम्ही रोख खेरेदी करत असाल तर सूट मिळणार नाही. किमतीचे कोणतेच बंधन नाही. परंतु, ही सूट फक्त एकदाच मिळेल.

3.मी स्टार्टअप सुरू करू इच्छितो, तर मी वडिलोपार्जित घर विकून आयकरात सूट घेऊ शकतो?
> होय. परंतु, घर विक्रीतून मिळालेली पूर्ण रक्कम गुंतवावी लागेल. जे स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करू इच्छितात त्यात तुमची भागीदारी ५१% असावी, अशी पूर्वी अट होती. आता २५% आहे.

 

हेदेखील महत्त्वाचे

> अनिवासी भारतीयांसाठी १८० दिवस भारतात राहण्याची अट शिथिल करत त्यांना आधार कार्ड दिले जाऊ शकतात. 
> अप्रत्यक्ष करांमध्ये कस्टम ड्यूटीत २१, केंद्रीय उत्पादन शुल्कात एक आणि जीएसटीत २१ दुरुस्तीचे प्रस्ताव आले आहेत.
> २०६अ अंतर्गत करदात्यांना आता वेगळे टीडीएस स्टेटमेंट फाइल करावे लागेल. त्यात कर कपात केलेली नाही. 
> एनआरआयला दिलेल्या पैशांवर देयकराचा टीडीएस आता ऑनलाइनही देता येईल.