आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Budget 2020 : Ahead Of The Union Budget PM Modi Meets With Top Ten Industrialist Of India To Reviving The Economy

पंतप्रधान मोदींनी रतन टाटा, मुकेश अंबानींसह 11 उद्योगपतींची घेतली भेट; म्हणाले - सरकारचे कौतुक करू नका, त्रुटी दाखवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्थिक विकास दर आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठीच्या उपायांवर झाली चर्चा
  • जुलै-सप्टेंबर तिमाहीतील जीडीपी वाढ 6 वर्षांच्या नीचांकावर

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आघाडीचे उद्योगपती आणि सीईओसोबत चर्चा केली. यामध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी यांच्यासह 11 दिग्गजांचा समावेश होता. या बैठकीत विकास दर आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या उपयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सरकारचे कौतुक करण्याऐवजी अर्थव्यवस्थेतील उणीवा दूर करण्यासाठी अभिप्राय द्या. या बैठकीमागीत हाच हेतू आहे असे मोदी म्हणाले. या बैठकीत सामील झालेल्या 8 आघाडीच्या उद्योगपतींच्या कंपन्यांची निव्वळ संपत्ती 6 जानेवारीला सुमारे 27 लाख कोटी रुपये होती. बैठकीला या उद्योजकांची होती उपस्थिती 

नाव/कंपनीवैयक्तिक नेटवर्थ (रुपयांत)
मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीज3.70 लाख कोटी
गौतम अदाणी, अदाणी ग्रुप1.13 लाख कोटी
सुनील भारती मित्तल,भारती एअरटेल54,720 कोटी
सज्जन जिंदल, जेएसडब्ल्यू ग्रुप41,760 कोटी
अनिल अग्रवाल, वेदांता23,760 कोटी
बाबा कल्याणी, भारत फोर्ज14,904 कोटी
आनंद महिंद्रा, महिंद्रा ग्रुप11,680 कोटी
वेणु श्रीनिवासन, टीव्हीएस ग्रुप383 कोटी
रतन टाटा, टाटा ग्रुप
एन चंद्रशेखरन, टाटा सन्स
अनिल नायक, लार्सन अॅण्ड ड टूब्रो

(सदरील नेटवर्थ फोर्ब्सच्या 2018-19 यादीनुसार. फोर्ब्सने टाटा, एन चंद्रशेखरन आणि अनिल नायक यांची वैयक्तिक संपत्ती जाहीर केली नाही)मोदी अर्थव्यवस्थेची वास्तविकता जाणून घेण्यासाठी उद्योगपतींना भेटत आहेत


मोदींनी गेल्या काही दिवसांमध्ये उद्योगातील लोकांची भेट घेतली होती. मागील बैठकीत कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ उदय कोटक, टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन, एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार आणि एचडीएफसी बँकेचे एमडी आदित्य पुरी सहभागी होते. अर्थव्यवस्थेचे वास्तविकता जाणून घेण्यासाठी मोदी या बैठका घेत आहेत.जुलै-सप्टेंबर तिमाहीतील जीडीपी वाढ 6 वर्षांच्या नीचांकावर 


जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशाची जीडीपीत घट होऊन 4.5 टक्क्यांवर आली आहे. आरबीआय आणि रेटिंग एजन्सींनी ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाही आणि पूर्ण वर्षाच्या वाढीचा अंदाजही कमी केला आहे. तर दुसरीकडे सरकारने जीडीपी वाढीसाठी उद्योगातील लोकांचा अभिप्राय घ्यावा असे उद्योग क्षेत्रातील काही लोक म्हणाले होते.बातम्या आणखी आहेत...