आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Budget 2020 : Prime Minister Narendra Modi Holds Meeting With Economists At NITI Aayog Over Economy

पंतप्रधान जेव्हा 40 अर्थशास्त्रज्ञांसोबत चर्चा करत होते तेव्हा अर्थमंत्री मात्र भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत मीटिंग करत होत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 दिवसांपूर्वी मोदींनी 11 प्रमुख उद्योजकांची घेतली भेट, पंतप्रधानांनी बजेट संदर्भात आतापर्यंत घेतल्या 13 बैठका
  • सरकारला अर्थसंकल्पाच्या तयारीत जीडीपी वादीबाबत चिंता, 2019-20 मध्ये जीपीडीत 5% वाढीचा अंदाज

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी नीती आयोगात 40 हून अधिक अर्थशास्त्रज्ञ आणि उद्योग तज्ज्ञांसोबत 2 तास बैठक घेतली. याबैठकीत मोदींचे लक्ष पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेवर होते. यावेळी त्यांनी वापर आणि मागणी वाढीवरील उपाययोजनांबाबत सूचना मागवल्या. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची बैठकीतील अनुपस्थिती चकित करणारी होती. पंतप्रधान देशातील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना अर्थमंत्री मात्र भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांसोबत बजटपूर्व चर्चा करत होते. 

अर्थसंकल्पापूर्वी मोदींची 13 वी बैठक 


या बैठकीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, सीईओ अमिताभ कांत आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती आणि जीडीपी वाढीसाठीच्या उपाय योजनांवर चर्चा झाली. या दरम्यान कृषी आणि पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रातील मुद्दे मांडण्यात आले. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे चेअरमन विवेक देबरॉय देखील या बैठकीला उपस्थित होते. अर्थसंकल्पापूर्वी अर्थव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी मोदींची ही 13 वी बैठक होती. यातील अर्थमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर सोशल मीडिया युझर्सनी प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रथमच मोदी अर्थमंत्र्यांच्या बैठकींपासून स्वतंत्रपणे बैठक घेत आहेत.
सरकार अर्थसंकल्प प्रक्रियेत व्यस्त आहे मात्र जीडीपी घटल्याने चिंताग्रस्त आहे. वृत्त संस्थांनुसार मोदी यावेळी अर्थसंकल्पाच्या तयारीत सक्रिय भूमिका पार पाडत आहेत. मोदींनी गेल्या काही दिवसांमध्ये आघाडीच्या उद्योजकांसोबत दोन बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसोबत 10 बैठका पार पाडल्या आहेत. यावरून अर्थव्यवस्थेच्या मोर्चावर पंतप्रधानांच्या कार्यशैलीचा अंदाज काढला जाऊ शकतो. पंतप्रधानांनी सर्व मंत्रालयांना 5 वर्षांच्या योजनेची ब्लू प्रिंट तयार करण्यास सांगितले आहे. त्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी मोदी भरपूर वेळ देत आहेत. जीडीपी वाढ 11 वर्षांत सर्वात कमी राहण्याचा अंदाज 


एक फेब्रुवारी रोजी येणाऱ्या अर्थसंकल्पासाठी पंतप्रधानांनी जनतेकडून देखील सल्ला मागवला आहे. अर्थव्यवस्थेत सुधार आणण्यासाठी कोणते उपाय करता येईल याबाबत त्यांना जाणून घ्यायचे आहे. जीडीपी 11 वर्षांतील निचांकावर जाण्याची जोखीमेत आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने 2019-20 मध्ये जीडीपी फक्त 5% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. असे झाल्यास ही जीडीपी ग्रोथ 2008-09 नंतर सर्वाधिक कमी असेल. 

मोदी सरकारमध्ये सर्व काही ठीक नाही 


अर्थ मंत्रालयाच्या एका सुत्राचे म्हणणे आहे की, सरकारमध्ये सर्व काही सुरळीत सुरू नाही. काही मंत्री कमी पडले ही बाब नाकारता येणार नाही. 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी काही म्हणणे घाईचे होईल. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत चालणार आहे. दुसरा टप्पा 2 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत चालेल. यामुळे मोदी सरकार-2 चे मे महिन्यात पहिले वर्ष पूर्ण होण्यापूर्वी बदल होण्याची शक्यता नाही.काँग्रेसने म्हटले - पुढच्या वेळी अर्थमंत्र्यांना सुद्धा बोलवा


बैठकीतील अर्थमंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने गुरुवारी एक ट्वीट करत सल्ला दिला आहे. पुढील अर्थसंकल्प बैठकीत अर्थमंत्र्यांना बोलविण्याचा निश्चितपणे विचार करा असे ट्वीट केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...