आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Budget 2020 Reax: Congress Leader Rahul Gandhi, Maybe This Was The Longest Budget Speech In History But It Had Nothing News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थमंत्र्यांना दोष देऊ नका, अर्थसंकल्प तर 'अलेक्सा' ने तयार केला; बजेटवर काँग्रेसची खोचक प्रतिक्रिया

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दशकाचे पहिले आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरे अर्थसंकल्प सादर केले. त्यावर विरोधी पक्ष काँग्रेसने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रवक्ते, संजय झा यांनी हे अर्थसंकल्प कृत्रिम बुद्धीमत्तेने तयार केल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये भावना नाहीत असा त्यांचा अर्थ होता. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या बजेटमध्ये काहीच नाही असे सांगितले आहे.

  • काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इतिहासातील सर्वात लांब असे अर्थसंकल्पाचे भाषण सादर केल्याचे म्हटले जात आहे. हे भाषण सर्वात लांब भाषण असू शकते. परंतु, यात काहीच नाही. निर्मलांनी सादर केलेले अर्थसंकल्प आतून पोकळ आहे. मुख्य समस्या बेरोजगारी होती. त्याला अर्थमंत्र्यांनी हातच लावला नाही.
  • काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी या बजेटवर टीका करताना म्हटले, की अर्थमंत्र्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कारण हे अर्थसंकल्प त्यांनी नव्हे, तर अलेक्साने तयार केले आहे. अलेक्सा अॅमेझॉन कंपनीचे आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आहे.
  • काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे, अर्थमंत्री निर्मला सीतारामण या अर्थसंकल्पामध्ये गणित समजावून सांगण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. मोठ-मोठे शब्द आणि वाक्य वापरून काहीच उपयोग नाही.
  • तर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले- दिल्लीकरांना या अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा होत्या. हे अर्थसंकल्प दिल्लीकरांच्या हितांचे रक्षण करेल अशी अपेक्षा ठेवतो. तरीही निवडणुकीच्या निमित्ताने या अर्थसंकल्पात दिल्लीकरांना खूप मिळणे अपेक्षित होते.