आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Budget 2020: SPG Protection For PM Modi Now Has A Budget Of Nearly Rs 600 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांना सुरक्षा देणा-या एसपीजीचे बजेट 600 कोटी रुपये केले, सध्या मोदींच्या सुरक्षेसाठी 300 जवान तैनात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन एसपीजी कायद्यानुसार, माजी पंतप्रधानांना फक्त 5 वर्षापर्यंतच ही सुविधा मिळते

नवी दिल्ली- यावर्षी अर्थसंकल्पात पंतप्रधानांच्या सुरक्षेत असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी)साठी 600 कोटी रुपये खर्च होणार आहेत. यापूर्वी एसपीजीचे बजेट 540 कोटी रुपये होते. सध्या फक्त पंतप्रधानांकडेच 300 जवान असलेली एसपीजी सुरक्षा आहे.


काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना मागच्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत एसपीजी सुरक्षा मिळाली होती. एसपीजी अधिनियमाच्या आढाव्यानंतर त्यांच्याकडून ही सुरक्षा काढून घेण्यात आली होती. यावर स्पष्टीकरण देताना सरकारडून सांगण्यात आले की, गांधी कुटुंबाने सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली.


माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडूनही एसपीजी सुरक्षा ऑगस्टमध्ये परत घेतली होती. यापूर्वी दोन माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि वीपी सिंह यांच्याकडूनही सुरक्षा परत घेतली. एसपीजीची स्थापना माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर (1985 मध्ये) करण्यात आली होती. सुरक्षा एजंसीला विद्यमान आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबादारी देण्यात आली आहे.

अटल सरकारने 2 वेळेस एसपीजी कायद्याचा आढावा घेतला होता

1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येनंतर एसपीजी सुरक्षा पूर्ण गांधी कुटुंबासाठी वाढवली होती. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातल्या एनडीए सरकारने एसपीजीच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्याचे ठरवले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान पीवी नरसिम्हा राव, एचडी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्याकडून सुरक्षा परत घेतली होती.


वाजपेयी सरकारने 2003 मध्ये परत एकदा एसपीजी अधिनियमाचा आढावा घेत त्यात बदल केला होता. त्यानंतर माजी पंतप्रधानांना 10 वर्षावरुन कमी करुन फक्त एक वर्ष केले होते. सोबतच वार्षिक सुरक्षेचा आढावा घेऊन सुरक्षा वाढवण्यावर विचार करण्याचे ठरवले होते.

वाजपेयींना त्यांच्या निधनापर्यंत एसपीजी सुरक्षा मिळाली

अटल बिहारी वाजपेयीं यांना 2018 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत एसपीजी सुरक्षा मिळत होती. मागच्या वर्षीदेखील या कायद्यात बदल करण्यात आला होता. आता पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना पद सोडल्यानंतर 5 वर्षापर्यंत सुरक्षा देण्याचे ठरवले आहे.