Home | National | Delhi | Budget Session PM Modi address Lok Sabha news and update

नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर पलटवार.. म्हणाले, उल्टा चोर चौकीदार को डांटे, हो क्या गया है आप लोगों को?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 07, 2019, 08:09 PM IST

मोदी आणि भाजपवर टीका करता करता देशाला वाईट म्हणू नका, असेही मोदींनी विरोधकांना बजावले.

  • Budget Session PM Modi address Lok Sabha news and update

    लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेत पंतप्रधानांचे अंतिम भाषण
    राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संबोधले भित्रा
    मी माझ्या मर्यादेत राहील, तेच योग्य आहे- पंतप्रधान
    महाआघाडी नव्हे 'महा-भेसळ', हे लोक सत्तेत येऊ शकत नाही- पंतप्रधान

    नवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेला संबोधित केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत निवडणुकांपूर्वीचे अंतिम भाषण करत आहेत. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कडाडून टीका केली. विरोधकांची टीका म्हणजे ‘उल्टा चोर चौकीदार को डांटे? हो क्या गया है आप लोगों को?', अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांचा समाचार घेतला. मोदी आणि भाजपवर टीका करता करता देशाला वाईट म्हणू नका, असेही मोदींनी विरोधकांना बजावले. महाआघाडी म्हणजे महाभेसळ असून हे लोक सत्तेत येऊ शकत नाही, असेही मोदींनी यावेळी सांगितले.

    पंतप्रधानांनी वाचला साडेचार वर्षांचा प्रगतीचा पाढा..

    गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने देशात केलेल्या प्रगतीचा पाढा पंतप्रधानांनी गुरुवारी संसदेत वाचला. देश गेल्या 55 महिन्यांत मोठ्या प्रगतीपथावर आहे. देशाची अर्थव्यवस्था देशात 6 व्या क्रमांकावर आहे. काही वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. मोदी सरकारने 10 कोटी शौचालय बांधले, 50 टक्के बँक खाती, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याचे काम कले. तसेच इंटरनेट डेटा सर्वात स्वस्त केवळ भारतात आहे. विशेष म्हणजे इंटरनेटचा वापर जगभरात सर्वाधिक भारतात होत असल्याचेही मोदींनी सांगितले.

    लेखा-जोखा जनतेसमोर मांडणार

    देशातील कोट्यवधी तरुणांचे पंतप्रधानांनी आभार मानले. मोदी सरकारने केलेल्या कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडला जाईल. लोकसभा निवडणुकांसाठी जे यंदा पहिल्यादा मतदान करणार आहेत. जे देशातील संसदीय लोकशाही प्रणालीची घटक बनणार आहेत, त्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

    आव्हानांना आम्ही घाबरत नाहीत..

    लोकसभेत 1947 ते 2014 एवढेच मी आज ऐकले. बीसी म्हणजे बिफोर काँग्रेस आणि एडी म्हणजे एफ्टर, असाच प्रकार आहे. काँग्रेसपूर्वी आणि काँग्रेसनंतरच देश असेच विरोधकांचा म्हणणे असल्याचे मोदींनी म्हटले. आव्हानांना जे घाबरतात, ते नवीन समस्या निर्माण करतात. आव्हानांना आव्हान देण्याचे काम आम्ही करत आहोत.

    मोदींसोबत माझी वादसभा होऊ द्या, ते पळून जातील, ते भित्रे आहेत- राहुल गांधी
    दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या भाषणात अल्पसंख्याकांना खुश करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधींनी पीएम नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. राहुल म्हणाले, की "पंतप्रधान देशाला तोडणारा नव्हे, तर जोडणारा असायला हवा. आरएसएस नागपूरहून देश चालवण्याच्या प्रयत्न करत आहे." एवढेच नव्हे, तर राहुल गांधींनी मोदींना समोरासमोर येऊन वादसभेचे आव्हान दिले. "मोदीजींसोबत माझी वादसभा होऊ द्या, ते पळून जातील, ते भित्रे आहेत." असे राहुल गांधींनी म्हटले होते.

    भाजप, मोदींना पराभूत करणार...
    राहुल गांधी पुढे म्हणाले, "आपण नरेंद्र मोदींचा चेहरा लक्षपूर्वक पाहाल तर आपल्याला दिसेल की त्यांच्या चेहऱ्यावर घबराट आहे. मोदींना कळून चुकले की देशाची वाटणी करून, घृणा पसरवून हिन्दुस्थानावर राज्य केले जाऊ शकत नाही. हिन्दुस्थानच्या पंतप्रधानांनी देशाला जोडण्याचे काम करावे. ते असे करत नसतील तर त्यांना पदावरून हटवायला हवे. पाच वर्षांपूर्वी म्हटले जात होते, की नरेंद्र मोदींची छाती 56 इंची आहे, ते 15 वर्षे राज्य करतील. आज काँग्रेस पार्टीने नरेंद्र मोदींच्या प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवल्या आहेत. शेतकरी असो वा मजदूर किंवा गरीबांच्या समस्या आणि भ्रष्टाचार आपल्याला दिसेल की मोदींचे सत्य देशाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले आहे. 2019 मध्ये काँग्रेस आता मोदी आणि भाजपसह आरएसएसला पराभूत करणार आहे."

Trending