आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅजेट डेस्क - चीनची स्मार्टफोन कंपनी रिअलमी 20 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात आपला लेटेस्ट कॅमरा फोकस्ड बजट स्मार्टफोन रिअलमी 5s लॉन्च करणार आहे. कंपनीने अलिकडेच फ्लिपकार्टवर याचे टीझर पेज जारी केले आहे. यामध्ये फोनच्या लॉन्चिंगची तारखेविषयी सांगण्यात आले आहे. टीझरमध्ये फोनची पहिली झलक पाहावयास मिळाली. फोनच्या बॅक पॅनलवर डायमंड पॅटर्न आणि क्वाड रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. रिपोर्टनुसार 5s सोबत रिअलमी X2 प्रो देखील लॉन्च केला जाऊ शकतो.
रेडमी नोट 7 सीरिजला देणार टक्कर
> फ्लिपकार्टवर जारी केलेल्या टीझर पेजनुसार रिअलमी 5s 20 नोव्हेंबरला भारतात लॉन्च करणार आहे. याच दिवशी रिअलमी आपल्या फ्लॅगशिप फोन रिअलमी X2 प्रो देखील लॉन्च करणार आहे.
> कंपनीने अलिकडेच या फोनच्या लॉन्चिंग कार्यक्रमाच्या तिकीटांची ऑनलाइन विक्री केली. विशेष म्हणजे फक्त 10 मिनिटांत हे सर्व तिकीट विकले गेले. कंपनी 300 रूपयांच्या तिकीटासोबत पावरबँकसह 2100 रूपयांचे बेनिफिट्स देत आहे.
> फोनच्या टीझर फोटोत याचे बॅक पॅनेल दाखवले आहे. यामध्ये चेरी रेड कलर ऑप्शनसोबत बॅक पॅनलवर डायमंड कट डिझाइन पाहण्यात मिळणार आहे.
> टीझर पाहता या स्मार्टफोनची विक्री फक्त फ्लिपकार्टवर होणार असल्याचे दिसून येत आहे.
> फोनच्या बॅक पॅनलवर क्वाड-रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. कॅमरेा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर मिळणार आहे.
> भारतात या फोनची टक्कर 48 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर असणाऱ्या रेडमी नोट 7 प्रो (किंमत 11,999 रू) आणि रेडमी नोट 7 (किंमत 9,790 रू) आणि रेडमी नोट 7S यांसोबत पाहण्यास मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.