Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | budh grah in budh vrushchik rashi know rashifal

बुध ग्रहाचे राशिफळ : मेषपासून मीनपर्यंत, तुमच्यावर कसा राहील बुध ग्रहाचा प्रभाव

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 12:01 AM IST

7 डिसेंबरपासून बुध ग्रहाने बदलली चाल, सर्व 12 राशींवर पडणार याचा थेट प्रभाव

 • budh grah in budh vrushchik rashi know rashifal

  शुक्रवार 7 डिसेंबरपासून बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये वक्रीपासून मार्गी झाला आहे. यापूर्वी 17 नोव्हेंबरला हा ग्रह वक्री झाला होता. बुध 26 ऑक्टोबरपासून वृश्चिक राशीमध्ये आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सध्या बुध ग्रहासोबत सूर्य आणि गुरु ग्रहही आहेत. मार्गी बुधाचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. येथे जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी कसा राहील येणार काळ...


  1. मेष - बुद्ध ग्रहामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुम्हाला नवीन वाहन खरेदीची संधी मिळू शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.


  2. वृषभ - कौटुंबिक नात्यामध्ये सुधार होईल. पती-पत्नीमधील प्रेम कायम राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. धन संबंधित गोष्टींसाठी हा काळ सामान्य राहील.


  3. मिथुन - जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल. शत्रूंवर विजय प्राप्त होऊ शकतो. नवीन काम सुरु करण्याची समाधी मिळेल. धनलाभाचे योग आहेत.


  4. कर्क - बुद्धीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. अपत्यांकडून सुख मिळेल. नातेवाईकांकडून एखादी आनंदाची बातमी समजेल.


  5. सिंह - या राशीच्या लोकांनी भूमी-भवन आणि संपत्तीमधून लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन सुख मिळू शकते. नोकरीत यश प्राप्त होण्याची शक्यता आहे.


  6. कन्या - नोकरी करत असलेल्या या राशीच्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यापार करणाऱ्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. जुन्या मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींवर कसा राहील बुध ग्रहाचा प्रभाव...

 • budh grah in budh vrushchik rashi know rashifal

  7. तूळ - बुध ग्रहामुळे घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळेल. मोठे पद प्राप्त होऊ शकते. प्रेम प्रसंगात यश मिळू शकते. लग्नात येत असलेल्या बाधा दूर होतील.


  8. वृश्चिक - धन संबंधित कामामध्ये येत असलेल्या अडचणी नष्ट होतील. एखाद्याच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

 • budh grah in budh vrushchik rashi know rashifal

  9. धनु - उत्पन्नपेक्षा जास्त खर्च करू नये अन्यथा अडचणीमध्ये सापडू शकता. प्रवासाला जाण्याचे योग आहेत. व्यापार करणाऱ्या लोकांना लाभ होऊ शकतो.


  10. मकर - या राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे योग जुळून येत आहेत. घर-जमिनीशी संबंधित कामामध्ये येत असलेल्या अडचणी नष्ट होऊ शकतात. मित्रांच्या मदतीने अडचणी दूर करू शकाल.

 • budh grah in budh vrushchik rashi know rashifal

  11. कुंभ - निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. आता घेतलेल्या निर्णयाचा भविष्यात फायदा होईल. कुटुंबात सुख-शांती कायम राहील. अपत्यांकडून सुख मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.


  12. मीन - बुध ग्रहामुळे नोकरीत प्रमोशनचे योग जुळून येऊ शकतात. घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मानसोबतच धन लाभ मिळण्याचे योग आहे.

Trending