प्रसिद्ध बिल्डरने राहत्या / प्रसिद्ध बिल्डरने राहत्या घरी गोळी झाडून संपवला जीवनप्रवास, काही महिन्यांपासून होते तणावाखाली

दिव्य मराठी वेब टीम

Jan 03,2019 04:43:00 PM IST
मुंबई- एका प्रसिद्ध बिल्डरने राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय अग्रवाल असे आत्महत्या केलेल्या बिल्डरचे नाव असून ते चेंबूरमधी संजोना विकासकाचे मालक होते. संजय अग्रवाल हे काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होते. त्यातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून आत्महत्येसाठी वापरलेले पिस्तूल ताब्यात घेतली आहे. तसेच संजय अग्रवाल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मानसिक तणावाखाली होते संजय...

संजय अग्रवाल यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, मागील काही महिन्यांपासून ते मानसिक तणावाखाली होते. त्या अनुषंगाने पोलिस आता तपास करीत आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून बिल्डर आणि बांधकाम क्षेत्रातली प्रगती मंदावली आहे. त्यामुळे संजय हे आर्थिक अडचणींमध्ये होते अशा चर्चा सध्या सुरु आहे.

X
COMMENT