आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलन(हिमाचल प्रदेश)- येथे आज(रविवार) दुपरी जोरदार पावसामुळे तीन मजली इमारत कोसळली. यात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 25 जण आत दबल्या गेल्याचा संशय. इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये ढाबा होता, यावेळी असम रायफल्सचे काही जवान चहा पिण्यासाठी आले होते, त्यामुळे जवानही यात अडकले आहेत. दरम्यान लष्कराचे 200 पेक्षा अधिक जवान, फायर ब्रिगेडच्या टीमने बचावकार्य सुरू केले ाहे. आतापर्यंत 18 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे, यात सेनेचे 10 जवान आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेवेळी इमारतीत 25 पेक्षा अधिक जण होते. सोलनमध्ये सकाळपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे भूस्खलन होऊन इमारत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही इमारत कुमारहट्टी-नाहन रोडवर आहे.
पावसामुळे बचावकार्यात अडथळा
सुत्रांनी सांगितले की, जेसीबीच्या मदतीने इमारतीचा कोसळलेला भाग बाजुला काढला जात आहे. पण पावसामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. बाहेर काढलेल्यांना जवळील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पंचकूलावरून एनडीआरएफच्या टीम्सना हिमाचल पाठवले आहे. लष्कराने एअरलिफ्ट करून जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.