आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीमध्ये 4 मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; पाच जणांना वाचवण्यात यश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भिवंडीत शुक्रवारी रात्री चार मजली इमारत कोसळल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. सोबतच, 5 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या इमारतीच्या ढगारातून 4 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. तरीही आणखी काही लोक यात दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि एनडीआरएफचे पथक बचावकार्यात लागले आहेत. 

भिवंडी-निझामपूर नगर परिषदेचे वरिष्ठ अधिकारी अशोक रणखंब यांनी सांगितले, की या दुर्घटनेपूर्वीच इमारतीचे एक पिलर पडले होते. त्यामुळे, इमारत कोसळण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण इमारत रिकामी केली होती. तरीही काही लोकांनी प्रशासनाच्या सूचना दुर्लक्षित करून इमारतीमध्ये प्रवेश केला होता. त्याच दरम्यान बिल्डिंग कोसळली. ही इमारत केवळ 8 वर्षे जुनी आहे. याची निर्मिती अनाधिकृतरित्या करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे.

डोंगरी दुर्घटनेत गेला होता 14 हून अधिक लोकांचा जीव
यापूर्वी मुंबईतील डोंगरी येथे इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये 14 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. सोबतच, जखमींवर मोफत उपचाराची घोषणा देखील करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...