आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात : कोंढवा परिसरात सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू, तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश; शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखाची मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येथील कोंढवा परिसरात रात्री उशाीरा कमपाउंड भिंत कोसळल्याने 15 मजुरांचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जी भिंत पडली त्याच्या अगदी शेजारीच काही मजूर पत्र्यांच्या झोपड्या बांधून राहत होते. त्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या भितींसह कार पार्किंगचा एक स्लॉट सुद्धा फुटला. भूस्खलनसदृश्य परिस्थितीत पार्किंगमध्ये लावलेल्या अनेक कार खड्ड्यात भिंतींसह पडल्याचे दिसून येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस सुरू असतानाच शनिवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. यातील 3 मजुरांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

 

कोंढवा येथील सोमजी पेट्रोलपंपजवळ असलेल्या या भिंतीच्या शेजारी बिल्डरने मजुरांसाठी झोपड्या उभारल्या होत्या. सदर भिंत मोठी असल्याने व कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा ढिगारा पडला आहे. आतापर्यंत सदर लेबर camp मधील 5 जणांचे मृतदेह फायर ब्रिगेड च्या मदतीने बाहेर काढले असून त्यांना ससून येथे पाठविले आहे. मृतांमध्ये आलोक शर्मा (28 वर्षे), मोहन शर्मा (20 वर्षे), अजय शर्मा (19 वर्षे), अभंग शर्मा (19 वर्षे), रवि शर्मा (19 वर्षे), लक्ष्मीकांत सहानी (33 वर्षे), अवधेत सिंह (32 वर्षे), सुनील सींग (35 वर्षे), ओवी दास (6 वर्षे), सोनाली दास (2 वर्षे), विमा दास (28 वर्षे), 12) संगीता देवी (26 वर्षे) यांचा समावेश आहे. महिला मजूर पूजा देवी (28 वर्षे) ही गंभीर जखमी आहे.

 

मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत

जलसंधारण मंत्री तानाजी सावंद यानी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने 4 लाखांची मदत जाहीर केली. तर दुसरीकडे, शिवसेनेच्या वतीने तातडीने देखील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखाची मदत देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सोबतच, या घटनेच्या तपासासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीला 24 तासांच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.