आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्यात आढळले 90 कुत्र्यांचे मृतदेह; पाय आणि तोंड बांधून फेकले जंगलात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - बुलडाणा वनक्षेत्रात विविध ठिकाणी 90 कु्त्रे मृतावस्थेत आढळून आले. या सर्वांचे पाय आणि तोंड बांधले असल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी ही घटना घडली होती. पण पोलिसांकडून रविवारी एफआयआर दाखल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे. वन विभागाने कुत्र्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. आता पोलिस पीएम अहवालाची वाट पाहत आहेत.

पोलिस अधिकारी आर.पाटील यांनी सांगितले की, 'बुलडाणा वनक्षेत्रातील गिरडा-सावळदबारा मार्गावर पाच ठिकाणी 100 हून अधिक कुत्रे फेकलेले आढळले. यातील 90 कुत्रे मृतावस्थेत तर काही जिंवत अवस्थेत आढळले. या कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधलेले होते. मृतदेह सडल्यानंतर पसरलेल्या दुर्गंधीमुळे ही घटना उघडकीस आली.'
 

जिवंत कुत्र्यांची केली सुटका 
पाटील यांनी सांगितले की, स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी वन विभागाला घटनेची कल्पना देऊन घटनास्थळी बोलवले. जिवंत कुत्र्यांना मुक्त करण्यात आले. वन विभागाने केलेल्या तक्रारीनंतर पशु क्रुरता प्रतिबंधक अधिनियम 1960 आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

पोलिस करत आहेत चौकशी 
पाटील म्हणाले की, शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून मारले आणि वनक्षेत्रात फेकून दिले. याप्रकरणी पोलिस कुत्रे पकडणाऱ्यांची चौकशी करत आहेत. तसेच या सगळ्या कुत्र्यांना एकाच दिवशी मारण्यात आले की कित्येक दिवसांपासून हे घडत होते हा तपासाचा विषय आहे.  

बातम्या आणखी आहेत...