आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेर्डा गावात महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला; भल्या पहाटे हत्या केल्याचा संशय

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - बुलडाणा जिल्हयातील खेर्डा गावात एका महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 7 वाजता ही धक्कादायक माहिती समोर आली. याच गावातील रहिवासी राहिलेल्या या महिलेचे वय 50 वर्षे होते. मृतदेहाची अवस्था पाहता भल्या पहाटे तिची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. स्थानिकांमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याची देखील चर्चा आहे. परंतु, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी शनिवारी सकाळी माहिती देताच पोलिस श्वान आणि फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेच्या शरीरावर कपडे नव्हते. तसेच महिला दिव्यांग होती. तिचा मृतदेह ताब्यात घेऊन सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. जळगाव-जामोद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षण सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखालील टीम या घटनेचा तपास करत आहे. त्यांनी देखील हत्येचा अंदाज वर्तवला आहे. तरीही पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच खरी माहिती समोर येईल. घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने नमुने घेतले असून यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहेत.