आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिशीनंतर बल्जिंग डिस्कची शक्यता, अनुष्का शर्मा घेत आहे याच आजारावरील उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला काही दिवसांपूर्वी बल्जिंग डिस्क आजार असल्याचे कळले. सध्या हा सामान्य आजार झाला आहे. यामुळे अनुष्काला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊया आजाराबाबत... 


तुम्हाला एकाच ठिकाणी जास्त काळ बसण्याची सवय असेल तर तुम्ही बल्जिंग डिस्कचे शिकार होऊ शकता. याची सुरुवात पाठीच्या मणक्यापासून होते आणि त्याचा प्रभाव हळूहळू शरीराच्या अन्य भागांवरही व्हायला लागतो. वेळीच यावर उपचार घेतले नाहीत तर संपूर्ण शरीरामध्ये वेदना व्हायला लागतात. 


कार्यालयामध्ये उशिरापर्यंत एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. साधारणत: हा आजार ३० ते ५० वर्षे वयोगटातील लोकांना होतो. जे लोक यावर उपचार करत नाहीत त्यांना युरिन किंवा इंटेस्टाइनशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. 


या गोष्टींकडे लक्ष द्या 
- लागोपाठ एकाच ठिकाणी बसू नका. कार्यालयात काम करत असताना आपली पोझिशन बदलत राहा. 
- नेहमी आपले पोश्चर योग्य ठेवा. योग्य पोश्चरमध्ये बसणे किंवा चालल्याने हा आजार होण्याचा धोका कमी राहतो. 
- आपल्या वजन नियंत्रित ठेवा. लठ्ठपणा वाढल्याने इतर आजारांसह हा आजार होण्याची शक्यतादेखील वाढते. 
- पौष्टिक आहार घेतल्यानेदेखील बल्जिंग डिस्कपासून बचाव करता येऊ शकतो. आपल्या आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. 
- आपली जीवनशैली बदला. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहत हा आजार टाळता येऊ शकतो. 


वस्तू उचलताना किंवा वाकताना वेदना होतात 
या आजारामध्ये कमरेच्या खालच्या भागामध्ये तीव्र वेदना होतात. अनेकदा मानेमध्ये दुखायला लागते आणि त्रास वाढल्यानंतर खांदे व हातांमध्येही वेदना होतात. या वेदना खोकला किंवा शिंक आल्यावर जास्त होतात. बल्जिंग डिस्क झाल्यावर हाता-पायांमध्ये ठणक निर्माण होते. सोबतच स्नायूंमध्येही वेदना होतात. यामुळे वस्तू उचलताना किंवा खाली वाकतानाही वेदना होतात. 

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, काय सांगतात डॉक्टर्स...

बातम्या आणखी आहेत...