आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडचे वजन अचानक वाढले तर व्यक्तीला आला संशय, त्याला वाटले दुस-या कुणासोबतही आहे अफेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैनचेस्टर. इग्लंडच्या ग्रेट मॅनचेस्टरमध्ये एका बॉयफ्रेंडच्या विचित्र वागण्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याने असे काही केले की, त्याच्या गर्लफ्रेंडने पोलिसांमध्ये तक्रार केली. यानंतर त्याच्या अशा वागण्यामुळे त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. खरेतर, येथे राहणा-या जेनुज जेलनला गर्लफ्रेंडच्या अचानक वाढलेल्या वजनामुळे तिच्यावर संशय येत होता. त्याच्या गर्लफ्रेंडच्या वाढलेल्या वजनाचे कारण तिचे एक्स्ट्रा अफेअर असू शकते असा त्याला संशय आला. असा संशय त्याला कसा येऊ शकतो हे कळाले नाही.

 

घरात लावले कॅमेरे 
ज्या घरात ते एकत्र राहते होते तिथे त्याने या संशयामुळे जेनुजने कॅमेरे लावले. कॅमेरासोबत स्पीकरही कनेक्ट होते. जेनुज जेव्हा कामावर जात होता, तेव्हा तो आपल्या फोनमधून गर्लफ्रेंडवर नजर ठेवायचा. तो तिचे प्रत्येक बोलणे ऐकायचा.
- हळुहळू त्याने आपल्या पार्टनर एगनेस्काला टॉर्चर करणे सुरु केले. त्याने एगनेस्काच्या लठ्ठपणावर वाईट अश्लिल कमेंट करणे सुरु केले. जर एगनेस्काने कॅमेरा ऑफ केला तर तो तिला कुणासोबत झोपली होती असे विचारायचा. 

 

त्याच्या आदेशावरुन कपडे बदलायचा लावत होता 
- पीडित गर्लफ्रेंडने पोलिसांना सांगितले की, जर तिने उष्णतेमुळे घरात शॉर्ट्स घातले, हे त्याने कॅमेरात पाहिले तर तो तिला फुल पँट घालण्यास सांगायचा. एगनेस्काने नकार दिला, तर तिला जिवेमारण्याची धमकी द्यायचा. 


माझे घर पागलखाना बनले होते 
- एगनेस्काने पोलिसांना सांगितले की, ती घटस्फोटीत होती. एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून दोघांची भेट झाली. यानंतर दोघांनी लग्न केले. एगनेस्काला पहिल्या लग्नापासून एक मुलगी होती, ती त्यांच्यासोबतच राहत होती. एगनेस्का म्हणाली, "दिवसभर कॅमेराच्या निगरानीमध्ये राहिल्यामुळे मी एखाद्या पागलखाण्यात राहत असल्याचा भास मला व्हायचा. मला स्वतःला पागल असल्याचा भास होत होता."

 

बॉयफ्रेंड पोहोचला तुरुंगात 
गर्लफ्रेंडच्या आरोपांनंतर पोलिसांनी मेंटल आणि सेक्शुअल हरॅशमेंटची तक्रार दाखल करुन जेनुजला तुरुंगात पाठवले. जेनुजचे वकील बचाव करत म्हणाले की, कॅमेरे हे घराच्या सुरक्षेसाठी लावण्यात आले होते. त्याच्या पार्टनरने हे आरोप विनाकारण लावले आहेत. पण पोलिसांनी काही मॅसेज आणि रेकॉर्डिंगच्या आधारावर जेनुजला दोषी ठरवले, यानंतर त्याला 20 आठवड्याचा तुरुंगवास आणि 2 महिने विना वेतन काम करण्याची शिक्षा सुनावण्यात आली. पीडित गर्लफ्रेंड त्याला घटस्फोट देऊन पोलँडमध्ये परतली.

बातम्या आणखी आहेत...