आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bumrah Dhawan Returns To ODI, T 20 Squad, Rohit And Shami Will Not Play In For T 20 Series Against Sri Lanka

वनडे, टी-२० संघामध्ये बुमराह-धवनचे पुनरागमन, रोहित व शमीला श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी विश्रांती

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : दुखापतीमधून सावरलेला वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन आता पुन्हा एकदा भारतीय संघामध्ये स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरले आहेत. या दाेघांची आता नव्या वर्षातील पहिल्याच मालिकेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. भारताचा संघ आता पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि अाॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध वनडेची मालिका खेळणार आहे. या दाेन्ही मालिकांसाठी निवड समितीने साेमवारी भारताच्या संघांची घाेषणा केली. या दाेन्ही मालिकांतून आता जसप्रीत बुमराह आणि धवनला पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे राेहित शर्मा आणि शमीला श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. येत्या ५ जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार आहे.

बुमराह हा ३० जुलैदरम्यान विंडीज संघाविरुद्ध झालेल्या कसाेटी सामन्यानंतर मैदानाच्या बाहेर हाेता. दुखापतीमुळे त्याला दीर्घ विश्रांती घ्यावी लागली. आता ताे यातून पूर्णपणे सावरला अाहे. यातूनच त्याला संघाकडून संधी मिळाली.

श्रीलंकेविरुद्ध टी-२० अाणि अाॅस्ट्रलियाविरुद्ध वनडे मालिका...
 

  • टी- 20 : काेहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस, ऋषभ पंत, जडेजा, शिवम दुबे, चहल, कुलदीप,बुमराह, नवदीप, शार्दूल ठाकूर, मनीष पांडे, वाॅशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन.
  • वनडे : कोहली (कप्तान), धवन, रोहित, लोकेश राहुल, श्रेयस , मनीष पांडे, ऋषभ, केदार जाधव, शिवम दुबे, जडेजा, कुलदीप, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह.

वनडे क्रमवारी : काेहली सलग तिसऱ्या वर्षी नंबर वन, गाेलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर

दुबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट काेहली हा यंदा सत्राच्या शेवटीही वनडेच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. यामध्ये भारताचा सलामीवीर राेहित शर्मा हा दुसऱ्या स्थानावर आहे. गाेलंदाजी क्रमवारीत वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह हा अव्वल स्थानावर आहे. नुकतीच आयसीसीने वनडेची क्रमवारी जाहीर केली. यात भारताच्या युवा खेळाडूंना माेठी प्रगती साधता आली. विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत १८५ धावांची कमाई करत भारताच्या सलामीवीर लाेकेश राहुलने क्रमवारीत प्रगती साधली. त्याला याच खेळीने १७ स्थानांचा फायदा झाला. यातून त्याने ७१ व्या स्थानावर धडक मारली. मालिकेत १३० धावा काढणारा श्रेयस अय्यर आता ८१ व्या स्थानावर आला.

मालिकेचे वेळापत्रक... 

टी-20 : श्रीलंकेविरुद्ध

पहिला : 5 जानेवारी गुवाहाटी
दुसरा : 7 जानेवारी इंदूर
तिसरा : 10 जानेवारी पुणे

वनडे : ऑस्ट्रेलियाविरुद्ध

पहिला : 14 जानेवारी मुंबई
दुसरा : 17 जानेवारी राजकोट
तिसरा : 19 जानेवारी बंगळुरू