आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटाशी निगडित व्यक्तींचे बंगले आणि फ्लॅटस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, वरुण धवन, शाहरुख खान, रणवीर सिंह, रणबीर कपूर यांचे मुंबईत टोलेजंग बंगले अाहेत, तर हृतिक रोशन भाड्याच्या घरात राहतो. त्यांचे आजोबा निर्माते जे. ओमप्रकाश यांचे निधन झाले. त्यांनी त्यांचा बंगला हृतिकच्या नावे केलेला आहे. दिलीपकुमार यांचा एक बंगला त्यांनी एका बिल्डरला दिला, परंतु वेळेअभावी तेथे इमारत तो बांधू शकला नाही म्हणून न्यायालयाने तो परत दिलीपकुमार यांना सुपूर्द करण्याचे आदेश दिले. लग्नानंतर ते आपली पत्नी तसेच शेजारी सायराबानो यांच्या बंगल्यात राहायचे. राज कपूर यांचा त्यांच्या स्टुडिओजवळच त्यांचा बंगला होता. तीन एकरांच्या या बंगल्यात सध्या फक्त रणधीर कपूर राहतात. त्यांनी वांद्र्याच्या माउंट मेरी रोडवर एक घर खरेदी केले असून त्याचे सध्या काम सुरू असून काही महिन्यांनी ते तेथे राहायला जातील. नंतर राज कपूर यांचा बंगला विकला जाईल आणि याद्वारे चेंबूरमधील चित्रपट निर्मितीचे काम बंद होईल. राज कपूर यांनी आपला दुसरा चित्रपट बरसात'च्या यशानंतरच स्टुडिओ बनवण्यास सुरुवात केली होती. आवारातील स्वप्नातल्या दृश्याचे चित्रीकरण येथेच झाले होते. तेव्हा अजून याच्या छताचे काम झालेले नसल्याने रात्रीच चित्रीकरण झाले. या स्टुडिओजवळच त्यांनी एक कौलारू घर भाड्याने घेतले, ज्याचा बंगला बनवण्याचा निर्णय त्यांनी श्रीमती कृष्णा कपूर यांच्या आग्रहाखातर घेतला. त्या घरमालकाने बाजारभावापेक्षा कमी किमतीत त्यांना ते घर विकले, ज्याच्या नूतनीकरणात सहापेक्षा जास्त बेडरूम असणारा बंगला बांधण्यात आला. जुन्या घरासमोर मैदान होते, जिथे 'मेरा नाम जोकर'च्या सर्कसला जागा देण्यात आली. देव आनंद यांचाही जुहूच्या आयरिश पार्कमध्ये बंगला होता, जेथे लग्नानंतर काही वर्षे ते राहिले. त्यानंतर त्यांनी जुहूमधील एका होस्टेलमध्ये मोठी खोली भाड्याने घेत अनेक वर्षे तेथे वास्तव्य केले, तसेच ते तेथे चित्रपट निर्मितीचेही काम करायचे. त्या वेळी त्यांच्यासोबत प्रिया राजवंश राहायच्या. त्यांच्या मृत्यूनंतर मुलाने त्यावर अधिकार सांगितला, पण प्रिया यांनी जागा सोडली नाही. असे म्हणतात की, चेतन आनंदच्या मुलाने प्रिया राजवंश यांचा खून केला व त्यासाठी त्याला तुरुंगवासही झाला होता. सलमान खान वांद्र्याच्या बीजे रोडवर गॅलेक्सी इमारतीत तळमजल्यावर एका फ्लॅटमध्ये तर त्यांचे आईवडील पहिल्या मजल्यावर राहतात. सलीम खान यांचे पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये तीन बंगले आहेत. निर्माते नासिर हुसेन यांचा पाली हिलमध्ये मोठा बंगला आहे, तर त्यांचे पुत्र मंजूर हुसेन यांनी आपला बंगला बहिणीला दिला आहे. मंजूर दक्षिण भारतात कुंदूरमध्ये नैसर्गिक शेती करतात. जेथील घरात रेडिओ, टीव्ही, एअरकंडिशनर नाही. आमिर खानने एका इमारतीतील तीन मजले घेतले असून त्यांचे घर व ऑफिस तेथेच आहे. रणवीर सिंह व दीपिका फ्लॅटमध्ये राहतात. अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत दक्षिण मुंबईत वरळीमध्ये राहते. ऋषी कपूर यांनी पाली हिलमधील बंगला पाडला असून तेथे बहुमजली इमारत बांधली. त्याच्याच बाजूला ते एका फ्लॅटमध्ये मुलगा रणबीर कपूरसह राहतात. अमिताभ बच्चन कन्येसह बंगल्यात राहतात. लग्नानंतर त्या पतीसह दिल्लीत काही वर्षे राहिल्या. त्या बहुमजली इमारतीत कधीच राहिल्या नाहीत व त्यांनी या विषयावर पुस्तकही लिहिले आहे. अशा बहुमजली इमारतीत तसे नमस्कार करण्याइतकेच सगळ्यांचे संबंध असतात. मानवी संवेदना बंगला किंवा फ्लॅटमध्ये राहण्याने ठरत नाही. अधिकांश निर्मात्यांचे फार्म हाऊस असून त्यांचे सण-उत्सव तेथेच साजरे होतात. जावेद अख्तर व शबाना जुहूमध्ये एका गल्लीत बहुमजली इमारतीत शौकत आझमींसह राहतात. पडद्यामागील, जयप्रकाश चौकसे, चित्रपट समीक्षक jpchoukse@dbcorp.in  

बातम्या आणखी आहेत...