आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Burari Case: Delhi Burari House Where 11 Of Family Commited Suicide Gets Tenant After 2 And A Half Years

अडीच वर्षांनंतर त्या घरात राहायला आले नवे कुटुंब, येथेच 11 जणांनी केली होती सामूहिक आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाडेकरू म्हणाले- आम्हाला भूत किंवा अंधश्रद्धेवर मुळीच विश्वास नाही
  • जाणून घ्या, नेमके काय होते कुप्रसिद्ध बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरण

नवी दिल्ली - अख्ख्या देशाला हादरवून सोडणारे बुराडी सामूहिक आत्महत्येचे प्रकरण शनिवारी पुन्हा चर्चेत आले आहे. अडीच वर्षांपूर्वी याच घरात एका कुटुंबाच्या 11 जणांनी सामूहिक आत्महत्या केली होती. तेव्हापासूनच या घरात प्रवेश करणे तर दूरच कुणी आस-पास फिरकण्याची हिंमत सुद्धा करत नव्हता. या घरामध्ये कथितरित्या त्या कुटुंबियांचे भूत असल्याची अफवा सुद्धा उडाली. परंतु, त्या सर्वच अफवा आणि अंधश्रद्धा असून त्याच अंधश्रद्धेला वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी राहायला आलो असे नवीन भाडेकरूंचे म्हणणे आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, डॉ. मोहन कश्यप नावाच्या पॅथालॉजिस्टने हे घर भाड्यावर घेतले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, अनेकांनी त्यांना हे घर घेण्यापासून रोखले होते. काहींनी या घरात भूत आणि प्रेत-आत्मा असल्याचा दावा सुद्धा केला. परंतु, आपल्या फॅमिलीच्या बजेटमध्ये ते घर मिळाल्याने दुसरा काहीच विचार केला नाही असेही ते पुढे म्हणाले. ज्या कुटुंबातील 11 जणांनी या घरात आत्महत्या केली. त्याच कुटुंबातील एका नातेवाइकाने सांगितले, की सामूहिक आत्महत्येनंतर अनेकांनी या घरात भूत असल्याची अफवा उडवली होती. घराच्या आस-पास राहणाऱ्यांनी असेही दावे केले की रात्री बे रात्री या घरातून प्रेत आत्मा निघतात. यानंतर हे घर विकले जाणार अशीही अफवा उडवण्यात आली. दिल्लीतील बुराडी येथे असलेल्या या घराची किंमत कोटींच्या घरात आहे. तसेच अनेक प्रॉपर्टी डीलर्सच्या यावर नजरा आहेत.

काय होते 2018 चे ते बुराडी कांड?

चुंडावत उर्फ भाटिया कुटुंब 20 वर्षांपासून दिल्लीच्या बुराडी येथील संत नगरमध्ये वास्तव्य करत होते. ते मूळचे राजस्थान येथील रहिवासी होते. त्यांच्या घराखालीच एक किराणा दुकान सुद्धा होते. या कुटुंबात नारायणी देवी (77), त्यांची मुले भावनेश (50), भावनेश यांची पत्नी सविता (48), दुसरा मुलगा ललित (42), त्याची पत्नी टीना (42), नारायणी यांची मुलगी प्रतिभा (57), प्रतिभाची मुलगी प्रियंका (33), भावनेशची मुलगी नितू (25), मोनू (23) आणि मुलगा ध्रुव (15) आणि ललितचा एकुलता एक मुलगा शिवम (15) इत्यादी लोक राहत होते.

2007 मध्ये ललित भाटिया यांचे वडील भोपाल सिंह यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ललित नैराश्यात गेला आणि झाडांची पूजा आणि प्राण्यांना अन्न दान करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, ललितच्या कुटुंबियांना ललितच्या शरीरात वडिलांची आत्मा आल्याचा गैरसमज निर्माण झाला. तो 2013 पासून आपल्या कुटुंबासाठी एक डायरी लिहित होता. त्याचे वडील (मृत) कथितरित्या जे काही सांगायचे तो या डायरीमध्ये लिहायचा. याच डायरीमध्ये या कुटुंबाने कुणी कशी आत्महत्या करावी, काय विधी करावा, श्वान छतावर कसा बांधावा ही संपूर्ण प्रक्रिया लिहिली होती. यानंतर 1 जुलै 2018 रोजी काहींनी एकमेकांना फासावर लटकवले तर उर्वरीत लोकांनी विष घेऊन किंवा गळफास घेऊन आत्महत्या केली. 22 जुलै 2018 रोजी या कुटुंबातील एकमेव जिवंत श्वानाचा देखील मृत्यू झाला. परंतु, पोलिसांच्या तपासात त्या दिवशी नेमके काय घडले याचा अद्याप उलगडा झालेला नाही. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या घटनेला सामूहिक आत्महत्या म्हटले आहे.