आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुराडी प्रकरण..4 महिन्यानंतर पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा, ती आत्महत्या नव्हती आणि मर्डरही नाही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुराडी प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. एकाच घरातील 11 जणांनी एकाचवेळी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्वांना एकच प्रश्न पडला होता,  तो म्हणजे 11 जणांसोबत नेमके काय झाले होते? जो काही तपास झाला त्यातून ठोस माहिती समोर आली नाही. परंतु चार महिन्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्या रात्री जे काही घडले तो एक अपघात होता. 11 जणांचा खुनही झाला नाही किंवा त्यांनी आत्महत्याही केली नाही.


चार महिन्यानंतर रिपोर्टमध्ये चकीत करणारा खुलासा
या घटनेचा उलगडा होत नसल्याने क्राईम ब्रँचने हे प्रकरण सायकोलॉजिकल पातळीवर तपासले. सायकॉलॉजिकल अॅनालिसिसनुसार, बुराडी घटना आत्महत्या नसून पूजे दरम्यान घडलेला एक अपघात होता. या घटनेतील सहभागी कोणत्याही सदस्याला हे माहीत नव्हते की, त्यांचा मृत्यू होईल. या खुलाशानंतर सर्व कल्पना आणि अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. यासोबतच हेही निश्चित झाले आहे की, ही घटना आत्महत्याही नव्हती आणि मर्डरही नाही.


चार महिन्यांपूर्वी झाला होता एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू
 चार महिन्यांपूर्वी भाटिया कुटुंबातील 11 सदस्यांचा एकाचवेळी मृत्यू झाला होता. मृतांमध्ये वृद्ध महिलेसह लहान मुलांचाही समावेश होता. सर्वजण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते. प्राथमिक तपासामध्ये अंधश्रद्धेपोटी या सर्वांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु या केसमध्ये नवनवीन खुलासे केले जात होते. मृतकांमध्ये नायारणी देवी (78), मोठा मुलगा भुवनेश उर्फ भुप्पी (50), 48 वर्षांची त्यांची पत्नी सविता, तीन मुळे नीतू, मोनी आणि ध्रव, भोपाल सिंह यांचा 45 वर्षाचा लहान मुलगा ललित, ललितची पत्नी 42 वर्षीय टीना, ललितचा मुलगा शिवम, भोपाल सिंहची 57 वर्षीय विधवा मुलगी प्रतिभा आणि प्रतिभाची 33 वर्षीय मुलगी प्रियांका यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...