Home | Maharashtra | Vidarva | Akola | 'Burning car' on Dhad Chikhali Road

धाड चिखली मार्गावर 'बर्निंग कार'चा थरार

प्रतिनिधी | Update - Aug 04, 2018, 11:20 AM IST

चालत्या इंडिगो कारने अचानक पेट घेतला. या घटनेत कार जळून खाक झाली आहे. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना

  • 'Burning car' on Dhad Chikhali Road

    धाड- चालत्या इंडिगो कारने अचानक पेट घेतला. या घटनेत कार जळून खाक झाली आहे. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २ जुलै रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास धाड चिखली मार्गावरील माळशेंब्याजवळ घडली. या घटनेतील जखमी चालकास उपचारार्थ बुलडाणा येथे भरती करण्यात आले आहे.


    चिखली येथील गणपत वाघ हे २ ऑगस्ट रोजी कामानिमित्त चांडोळ येथे आले होते. येथील काम आटोपून ते त्यांच्या एमएच २८, एएन ०३२९ या क्रमांकाच्या इंडिगो कारने संध्याकाळच्या सुमारास चिखली येथे जाण्यासाठी निघाले. चिखली धाड मार्गावर असलेल्या माळशेंब्याजवळ येताच अचानक कारने पेट घेतला. अवघ्या काही वेळातच त्यांची कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या वेळी आगीने त्यांना बाहेर निघण्याची संधीही दिली नाही. त्यामुळे कार चालक, मालक असलेले गणपत वाघ गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सपकाळे यांनी घटनास्थळ गाठून जखमीला बुलडाणा येथे उपचारार्थ पाठवले. घटनेचा पुढील तपास रायपूर पोलिस करत आहेत.

Trending