आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातानंतर लातूर-नांदेड रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर-नांदेड रस्त्यावर मंगळवारी सकाळी एका अपघातग्रस्त कारला आग लागली. यामध्ये ही कार पूर्णपणे जळून खाक झाली.  या प्रकारामुळे वाहनचालकांत काही काळ घबराट झाली. हा प्रकार अपघात होता की काेणी जाणीवपूर्वक पेटवून दिली याचा शोध सुरू आहे. 


पोलिसांनी सांगितले की, लातूर ते नांदेड रस्त्यावर भातखेडा गावाच्या परिसरात सोमवारी रात्री दोन कारची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये दोन्ही कारमधील व्यक्ती जखमी झाल्या. या कार मंगळवारी सकाळपर्यंत जागेवरच पडून होत्या. त्यातील एका इंडिका कारला मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. गाडीमधील डिझेल आणि आॅईलमुळे गाडीने पेट घेतला. पाहता पाहता टायर, सीट भक्ष्यस्थानी पडले आणि संपूर्ण कार जळून खाक झाली.  नवनाथ दत्ता पांचाळ यांच्या मालकीची ही कार होती.  अपघातात जखमी झाल्यामुळे ते आणि त्यांचे कुटुंबीय सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त कार  कुणी पेटवून तर दिली नाही ना असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.